मोहोळ मतदार संघाचे आमदार यशवंत माने यांच्यासह तिघांना कोरोनाची लागण

408

 

सोलापूर ग्रामीण प्रतिनिधी ॥ ऋषीकेश

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आमदार माने यांची पत्नी, मुलगी आणि त्याचे स्वीय सहायक यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

इंदापूर तालुक्‍यातील शेळगाव हे मोहोळचे लोकप्रतिनिधी असलेले माने यांचे मूळगाव आहे. पुण्यातील एका मित्राचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कात असल्याने आमदार माने यांनीही कोरोना तपासणी करून घेतली. त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. खबरदारीचा उपाय म्हणून पत्नी आणि मुलीचीही तपासणी केली. त्या दोघींचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

या तिघांनाही कोरोनाचा कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे. आमदार माने, पत्नी आणि मुलगी सध्या पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेले माने यांचे स्वीय सहायक निमगाव केतकी येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. आमदार माने हे कोरोना विषाणूच्या काळात मोहोळ मतदारसंघात नियमितपणे कामाचा आढावा घेत असतात.