पत्रकार विजय केदारे यांच्या हल्ला करणाऱ्या वर पत्रकार सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करा बल्लारपुर पुरोगामी पत्रकार संघाची मांगनी

246

 

शंकर महाकाली
दख़ल न्यूज़ भारत
पोर्टल न्यूज़ व यूट्यूब चैनल
चंद्रपुर/बल्लारपुर तालुका प्रतिनिधि
📲 8855043420

बल्लारपुर:- पुरोगामी पत्रकार संघ, नाशिक चे जिल्हा कार्याध्यक्ष विजय केदारे हे दैनिक जनमत मराठी वृत्तपत्राचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी दैनिक जनमत मराठी वृत्तपत्रातून एक अन्यायाविरोधात वाचा फोडणारी बातमी प्रकाशित केली होती. त्याचाच राग मनावर धरत तेथिलच काही समाजकंटकांनी व गावगुंडानी पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय केदारे यांच्या निवासस्थानावर हल्ला चढवला आणि त्यांची नाहक मानहानी सुद्धा केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामधून या घटनेचा पत्रकार बांधव जाहीर निषेध व्यक्त करत आहेत, तरी पत्रकारांवरील हल्याप्रकरणी संबंधित समाजकंटकावर व गावगुंडावर कडक व कठोर कारवाई व्हावी या घटनेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे व विजय केदारे यांना न्याय मिळवून द्यावा.अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातुन जोर धरत आहे. त्याचप्रमाणे सदर समाजकंटकांनी केलेल्या क्रूर कृत्याचा पुरोगामी पत्रकार संघ तालुका बल्लारपुर च्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. पत्रकार यांच्या निवासस्थानी हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर व गावगुंडावर पत्रकार सुरक्षा कायद्यानुसार कडक कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा करावी अशा आशयाचे निवेदन पुरोगामी पत्रकार संघ तालुका बल्लारपुर वतीने तहसीलदार, तहसील कार्यालय बल्लारपुर व पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बल्लारपुर यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई यांना पाठविण्यात आले.
याप्रसंगी निवेदन देताना प्रशांत रणदिवे तालुकाध्यक्ष, पुरोगामी पत्रकार बल्लारपुर , विकास दुपारे , कार्याध्यक्ष , पुरोगामी पत्रकार संघ, बल्लारपुर , शेख आरीफ शेख सरवर, उपाध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ बल्लारपुर ,शंकर महांकाली सचिव पुरोगामी पत्रकार संघ बल्लारपुर, गौतम कांबळे कोषाध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ बल्लारपुर , पराग गुंडेवार सहसचिव , पुरोगामी पत्रकार संघ बल्लारपुर , राकेश कांबळे,प्रसिद्धी प्रमुख पुरोगामी पत्रकार संघ बल्लारपुर , इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.