कोराडी च्या आनंद निकेतन मधील बाबा जगदीश गिरी महाराजांच्या शिष्याचा कोरोना मुळे म्रृत्यु

1119

 

सुनील उत्तमराव साळवे
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कोराडी / नागपुर : २४ आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात असलेल्या कोराडी ग्रा. पं. येथील वार्ड क्रमांक २ मध्ये राहणारे डुली महाराज वय ६९ वर्ष यांना काल सायंकाळी नार्मल अटैक आला होता. त्यानंतर त्यांना शेजाऱ्यांनी ऐलैक्सिस हाँस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. परंतु त्यांचा वाटेतच म्रृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्यानंतर ऐलैक्सिस हाँस्पिटल च्या डाँक्टर्स यांनी मेयो शासकीय रुग्णालयात त्यांची कोव्हीड टेस्ट करण्यासाठी पाठवले असता तिथे डुली महाराज यांची टेस्ट पाँजिटीव आली. त्यानंतर मेयो रुग्णालय प्रशासनाने आवश्यक ती कागदोपत्री कारवाई करुन त्यांचे प्रेत त्यांच्या परिवाराच्या हवाले केले व त्या प्रेतावर नागपुरातच अंत्यसंस्कार करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या नातेवाईकांनी डुली महाराज यांचेवर नागपुरात च अंत्यसंस्कार केले.
आज कोराडी ग्रा. पं. प्रशासनाने महाराज यांचे निवासस्थानी व आनंद निकेतन येथे (गुरांच्या दवाखान्याजवळ) सचीव उत्तम झेलगोंदे यांचे मार्गदर्शनाखाली एरिया सेनिट्राईज करुन निवासस्थान सील केले . तसेच आज त्यांच्या परिवारातील एकुण ७ जणांची टेस्ट केली असता त्यांचा मुलगा वय ३५ वर्ष व मुलगी वय ३० वर्षे यांची टेस्ट पाँजिटीव आली. तर इतर ५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. लोवर कांन्क्टैक्ट असलेल्या इतर ४ जणांची उद्या टेस्ट करणार असल्याचे सचिव उत्तम झेलगोंदे यांनी सांगितले. महाराजांच्या संपर्कात आलेल्यांनी अतितात्काळ आपापली टेस्ट करुन घेण्याचे कोराडी ग्रा. पं. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे. काळजी करू नका. लवकर लवकर टेस्ट करुन आवश्यक उपाययोजना केल्या तर आपण सहज कोरोना वर मात करु शकतो.