जिल्हयात आज 14 कोरोनामुक्त तर 22 नविन कोरोना बाधित

261

 

हर्ष साखरे दखल न्युज भारत

गडचिरोली,

दि.24: जिल्हयात आज 14 जण कोरोनामुक्त झाले  तर नवीन 22 जण कोरोना बाधित आढळले. यामुळे जिल्हयातील सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या 104 झाली. आतापर्यंतची कोरोना बाधितांची एकूण संख्या 916 झाली असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 811 झाली.

आज कोरोनामुक्त झालेल्या 14 रुग्णांमध्ये गडचिरोली येथील 4 स्थानिक , मुलचेरा 1, भामरागड 2, सिरोंचा तालुक्यातील 7 स्थानिकांचा समावेश आहे. तसेच आज नव्याने 22 कोरोनाबाधितांमध्ये चामोर्शी तालुक्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रातील 7 जण कोरोनाबाधित आढळून आले. सिरोंचा तालुक्यातील रुग्णाच्या संपर्कातील 2, तसेच 2 जण वरंगल येथून आलेले बाधित आढळले तसेच 2 स्थानिक बाधित आढळले. एटापल्ली तालुक्यातील तहसिल कार्यालातील 1, हेडरी येथील 1 एसआरपीएफ जवान बाधित आढळला. धानोरा येथील सीआरपीएफ 113 बटालीयनचे 4 जण, गडचिरोली तालुक्यातील 2 यामध्ये 1 स्थानिक तर 1 जण दुग्ध विकास विभागात कामावर नागपूर येथून रुजू होण्यासाठी आलेला, व जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना बाधित असल्याचे तपासीनंतर आढळून आले. तसेच कुरखेडा येथील 1 जण मार्केट लाईन मधील बाधित असल्याचेआढळून आले. अशा प्रकारे आज 22 जण कोरोना बाधित आढळून आले तर 14 जण कोरोनामुक्त झाले.