महाराष्ट् राज्य धोबी(परिट)समाज महासंघाच्या विदर्भ महासचिवपदी राजु तुराणकर यांची नियुक्ती

157

 

वणी : परशुराम पोटे

महाराष्ट् राज्य धोबी(परिट)समाज महासंघ प्रदेश कार्यकारणीत विदर्भ महासचिव पदी राजु तुराणकर यांची एका नियुक्ती पत्राद्वारे निवड करण्यात आली आहे.
राजु तुराणकर हे वणी शहर शिवसेनेचे शहर प्रमुख असुन ते गाडगे बाबांच्या कार्याचा वसा घेवुन समाजासह ,रंजल्या गांजल्यांच्या मदतीला अहोरात्र धाऊन मदत करतात. तसेच त्यांनी कित्येक अन्यायग्रस्तांना आंदोलनाद्वारे न्यायहक्क मिळऊन दिला.त्यामुळेच त्यांच्याकडे परिसरात युवा तडफदार नेत्रुत्व म्हणु पाहिले जातात.त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्टातील धोबी समाजाच्या प्रश्नासाठी शासन आणी व्यवस्थेच्या विरुद्ध लढाईसाठी तसेच ग्राम पातळी पर्यंत राज्यातील ३० लाख धोबी समाजाच्या सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक व राजकिय हक्काच्या या एेतीहासिक लढ्यातील एक अग्रणी सैनानी म्हणुन जबाबदारी सोपविण्यात आली आहे.असे महाराष्ट् राज्य धोबी(परिट)समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डि.डि.सोनटक्के,कार्याध्यक्ष अनिल शिंदे,मुख्यमहासचिव जयराम वाघ तसेच विदर्भ अध्यक्ष शंकरभाऊ परदेशी यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.