माणकी येथे ८३ हजाराची घरफोडी, अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल

257

 

वणी : परशुराम पोटे

वणी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा माणकी येथे मध्यरात्री झालेल्या घरफोडीत नगदी रकमेसह ८३ हजाराचा मद्देमाल चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
विठ्ठल गाऊत्रे असे फिर्यादीचे नाव असुन त्याने दिलेल्या तक्रारीत मध्यरात्री २:३० वाजताचे सुमारास घरातील कपडे अस्तव्यस्त दिसुन आल्यामुळे घरात चोरी झाल्याचा संशय आला, त्यामुळे सोन्याचे दागिने व रोख असलेल्या घरातील लोखंडी पेटीकडे धाव घेतली असता पेटी फुटुन असल्याचे आढळले. त्यामुळे पेटीतील दागिने व रोख रक्कम तपासली असता सोन्याची एक चैन किं.अं.२५ हजार,एक पोत किं.अं.१० हजार,अंगठी किं.अं.११ हजार व रोख ३८ हजार रुपये असा एकुन ८३ हजार रुपयाचा मुद्देमाल कोनीतरी अनोळखी व्यक्तीने लंपास केला आहे.अशा तक्रारीवरुन वणी पोलीसांनी अद्ण्यात आरोपीविरुद्ध भादंवी कलम ३८० नुसार गुन्हा दाखल करुन तपासात घेतला आहे.

महादेव चिडे यांचे घर होते टार्गेट!

मध्यरात्री १ वाजताचे सुमारास कोनीतरी अनोळखी ३ ईसम गावातील महादेव चिडे यांच्या घराकडे येत असल्याची चाहुल लागताच महादेव चिडे यांचेसह त्यांचे दोन मुले घराबाहेर निघाले.यावेळी त्या चोरट्यांचा डाव फसला.आणी त्या चोरट्यांनी नजिकच असलेल्या नाल्याकडे पळ ठोकला. परंतु थोड्यावेळातच विठ्ठल गाऊत्रे यांच्या घराला टारगट केले,आणी चोरट्यांनी आपला डाव अखेर साधला.
माणकी हे गाव वणी शहरापासुन अवघ्या १५ ते २० मिनिटाच्या अंतरावर असुन गावातील शांतता व सुव्यवस्था अभादीत आहेत.परंतु अलिकडे एक महिण्यापासुन गावाला कोनाचे ग्रहन लागले की, गावात दारु,जुगार व आता चोरी सारख्या घटना घडायला लागल्या आहेत. गावात गावस्तरिय तंटामुक्त समिती असुन उत्तमरित्या कार्यभार पार पाडत असतांनाच अशा घटना घडत आहेत.या घटनेला जागीच पायबंद घालण्यासाठी आता तंटामुक्त समितीने कंबर कसली असुन पोलिसांनी सहकार्य करावे असे बोलले जात आहे.