कंबलपेठा मार्गावरील अट्टीवागू नाल्यावर नवीन पुल बांधकामास निधी मंजूर करावी – जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे जाफराबाद चे सरपंच बापु सडमेक यांची निवेदनातून मागणी

164

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम:-सिरोंचा तालुक्यातील टेकडाताल्ला परिसरातील अनेक गावांना जोडणारा एकमेव मुख्य रस्ता, टेकडा-कंबालपेठा मार्गावरील अट्टीवागू नाल्यावरील पुलाचे बांधकाम होऊन 35-ते 40 वर्ष झाले आहे.हा पूल जीर्णावस्थेत असून गेल्या 15 दिवसापासून या परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या नाल्यावरील अर्धा पूल वाहून गेला.त्यामुळे टेकडाताल्ला परिसरातील अनेक गांवाचा संपर्क तालुका व जिल्हा मुख्यालयाशी पूर्णपणे तुटला आहे.या भागातील शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, शासकीय कामानिमित्त तालुका जिल्हा मुख्यालयी जाणे कठीण झाले आहे. या मार्गावरील पूल वाहून गेल्यामुळे आजारी रुग्णांना दवाखान्यात नेता येत नाही परिणामी त्याला उपचाराअभावी प्राणास मुकावे लागण्याची शक्यता आहे. या परिसरातील शेकडो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, आरोग्य कर्मचारी, रुग्ण यांना होणाऱ्या अडचणींचा गंभीर विचार करून शासनाने तअट्टीवागू नाल्यावरील नवीन पुलाच्या बांधकामासाठी तात्काळ निधी मंजूर करावा व नवीन पूल होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात नाल्यावरील पुलाची दुरुस्ती करावी व ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी व या परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे जाफ्राबाद ग्रामपंचायत चे सरपंच बापू सडमेक,आदिवासी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी स्वप्नील पेद्दी, मुस्तीफ शेख, पर्वतालु मंडेला, महेश गादे, हरीश नैताम व आविसच्या इतर कार्यकर्त्यानी केली आहे.