100% अनुदानावरील आईल इंजिन व एचडीपीई पाईप योजनेंतर्गत मंजूर आदिवासी लाभार्थी वंचीत

162

कुरखेडा/राकेश चव्हाण प्र
आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारीआदिवासी विकास महामंडळाचे वतीने विविध योजना राबविण्यात येतात. आदिवासी शेतकरी बांधवांसाठी १००टक्के अनुदानावर ऑइल इंजिन व
एचडीपीई पाईप योजनेच्या अंमलबजावणीत होणाऱ्या दिरंगाईमुळे कुरखेडा तालुक्यातील मंजूर आदिवासी लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत.
१००टक्के अनुदानावर ऑइल इंजिन व एचडीपीई पाईप योजनेंतर्गत कुरखेडा तालुक्यातील ७२ आदिवासी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली ,मंजूर यादी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालया मार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने ४जानेवारी२०१९ला लाभार्थ्यांचे सात बारा,बँक पासबुक झेरॉक्स प्रत,100/-रु.स्टॅम्प पेपर , मोबाईल क्रमांक व आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली. त्यानंतर येथील उपप्रादेशिक कार्यालयाचे वतीने११जुलै २०१९ला प्रत्येक मंजूर लाभार्थीना पत्र पाठवून ऑइल इंजिन व एचडीपीई पाईपाची मंजूर रक्कम आपल्या बँक खात्यावर ऑनलाईन टाकणे असल्याने बँकखाते पासबुक,आधारकार्ड क्रमांक व आधारकार्ड लिंक मोबाईल क्रमांक, बँकेचे IFSC कोड,जन्मतारीख व जातीचे प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली, त्यानुसार कागदपत्रे सादर करण्यात आली .कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर लगेच तुमच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र एक वर्षाचा कालावधी लोटूनही लाभार्थ्यांचे बँक खात्यात रक्कम जमा झाली नसल्याने त्यांच्यावर योजनेपासून वंचीत राहण्याची पाळी आली आहे.त्यानां जर हे अनुदानावर हे ऑईल इंजीन व पाईप मिळाले असते तर वर पाण्यावर अवलंबून असणार्या शेतकर्याना उपयोगी पडले असते.