ग्रांमपंचायत कर्मचाऱ्यांचे २८ ला राज्यव्यापी काम बंद आंदोलन . तर २९ ला ग्रा .वि. मंत्री मुश्रीफ यांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन .

राधानगरी पं .स .गटविकास अधिकारी शरद भोसले यांना निवेदन .

567

 

राधानगरी पं .स .गटविकास अधिकारी शरद भोसले यांना निवेदन .

प्रतिनिधी / उदय कांबळे

कर वसुली व उत्पन्नाची जाचक अट असलेला २८ एप्रील२०२०चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करा या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवार दि .२८ ऑगस्ट रोजी एक दिवसीय राज्यव्यापी कामबंद आंदोलन राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी करणार असून
दि .२९ ऑगस्ट रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री मा . ना . हसन मुश्रीफ यांचे कोल्हापूर ( कागल ) येथील निवासस्थाना समोर धरणे आंदोलन करणार आहेत . सदर आंदोलनाचे निवेदन राधानगरी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे .
कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी असलेली कर वसुली, लोकसंख्येचा आकृतीबंध व उत्पन्नाची जाचक अट असलेला दि . २८ एप्रील२०२०चा अन्यायकारक शासन निर्णय त्वरीत रद्द करुन, आकृतीबंधातील व आकृतीबंधाच्या बाहेरील सर्व ग्रा.पं. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाने जबाबदारी समजुन १ooटक्के अनुदान दयावे , वेतन निश्चितीसाठी नेमण्यात आलेल्या मा . अभय यावलकर समितीच्या अहवालातील शिफारशी मान्य करुन राज्यातील ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी त्वरीत लागू करावी, नुकत्याच १० ऑगस्ट २०२० रोजी महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने जाहीर केलेल्या अधिसुचना व राजपत्रानुसार सुधारित किमान वेतनातील वाढ तात्काळ लागू करा . ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन अर्थात पेन्शनचा कायदा लागू करा . कर्मचाऱ्यांच्या अनुदान वेतनातून शासनाने दोन वर्षापासुन कपात केलेल्या भविष्य निर्वाह निधीGPFची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात त्वरीत जमा करा . ऑनलाईन वेतन प्रणालीमध्ये अधिक सुधारणा व तत्पर करुन कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान दरमहा जमा करा . यासह मागील अनेक वर्षापासुन प्रलंबित प्रमुख मागण्यांना घेवून, आयटकशी संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने दि .२८ ऑगस्ट२०२०२ोजी एकदिवसीय राजव्यापी संप व कामबंद आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे . महासंघाच्या आवाहनानुसार दि .२८ ऑगस्टला होणाऱ्या संपात राधानगरी तालुक्यातील ग्रा.पं. कर्मचाऱ्यांनी मोठया संख्येने सामील होण्याचे आवाहन राधानगरी तालुका ग्रा .पं. कर्मचारी महासंघाचे ( आयटक ) अध्यक्ष रोहित भंडारी यांनी केले आहे .
दरम्यान ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचे निवेदन राधानगरी पंचायत समिती गटविकास अधिकारी शरद भोसले यांना तालुका महासंघाचे अध्यक्ष रोहित भंडारी यांच्या हस्ते देण्यात आले . यावेळी तालुका सचिव दिपक कांबळे , सदस्य विनायक मोहिते , सागर सावेकर उपस्थित होते .