उपराई ते महिमापुर रस्त्याच्या नाल्यांची दुरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात युवासेना उपतालुकाप्रमुख प्रतिक राऊत यांचा आंदोलनाचा इशारा

273

सुयोग टोबरे/जिल्हा प्रतिनिधी
दखल न्यूज भारत अमरावती
खल्लार सर्कल मधील उपराई ते महिमापुर रस्त्याने मोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना मोठ्या कसरतीने रस्ता पार करावे लागत आहे लॉकडाऊन आधी या पुलांचे काम झाले होते शासनाने या पुलांसाठी निधी उपलब्ध करून दिला होता परंतु काही महिन्यातच या पुलाचे केलेले काम खरडुन निघाले व त्यात खड्डे तसेच राहिले या पुलांची कामे थातूरमातूर पद्धतीने करून हे खड्डे बुजविण्यात आले होते, आज सकाळी चौहान ट्रान्सपोर्ट चां ट्रक कंट्रोलच्या धान्याचा साठा घेऊन जात असताना त्या नाल्यात खड्डे पडल्यामुळे तो ट्रक तेथे पलटी झाला त्या नाल्याचे लवकरात लवकर काम करण्यात यावे अन्यथा खल्लार सर्कल मध्ये एकाही लोकप्रतिनिधींना फिरु देणार नाही असा इशारा युवासेना उपतालुकाप्रमुख प्रतिक राऊत यांनी दिला आहे