शास. वि. ज्ञा.वि. संस्था, अमरावती सन २०२०-२१ मधे तिप्पट वाढविलेले ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शुल्क ( तिप्पट लगान ) रद्द करणे बाबत शिवसेनेचे आवेदन…

164

अनील ढोके
साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
अमरावती
सन २०१८-१९ मधे ऑनलाईन अँडमिशन फ़ार्म भरन्याची फ़ी माहितीपत्रका सहित केवळ ५० / – रु एवढी होती.२०१९ -२०२० या सत्रात सरळ प्रवेश प्रक्रिया ( पण फीची पद्धत मात्र जुनीच )अशी राबविल्या गेली,मात्र सन २०२०-२१ मधे कोरोना महामारीच्या या संकट काळात हिच फ़ी १५० / – रु एवढी अवाढव्य म्हणजेच तिप्पट का वाढवीन्यात आली .. ? शिवाय याच महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीवर्गास पुढील वार्षीक सत्रात प्रवेश घेणे करीता पण पुन्हा नव्याने ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेस वाढीव शुल्क भरूनच मगच सामोरील वर्गात प्रवेश मिळणार आहे.अनेक विध्यार्थ्यना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत फ़ार्म भरतांना अनेक अड़चनिना सामोरे जावे लागत आहे,आपले हे शासकीय महाविद्यालय आहे, व्यवसायिक नाही. याचे भान आपण ठेवणे गरजेचे आहे.
आपल्या महाविद्यालयात शेतकरी,कष्टकरी,मोलमजुरी व ग्रामीण भागामधुन येणाऱ्या विद्यार्थी वर्गाची संख्या ईतर महाविद्यालयाच्या तुलनेने जास्त प्रमाणात आहे हे वास्तव आहे . किचकट स्वरूपाची ही प्रक्रिया त्यांच्या व त्यांच्या पालकांच्या कितपत अंगी पडेल देव जाणे..नाहीतर पुन्हा त्यांना पैसे खर्च करून सायबर कॅफे वाल्यांच्या दारात जावेच लागेल यात काही शंकाच नाही.
या वर्षी ” वृद्धि कम्प्यूटर ” नामक कोणालातरी ऑनलाइन प्रवेश सम्बंधी कंत्राट देण्यात आला असे कळाले.२०१८-१९ या सत्राचे वेळी अमरावतीतील ” लक्ष आय टी सोल्युशन ” या फर्म ला सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपयात सर्व करार करण्यात आला होता . परंतु या वर्षी १५० / -रुपये घेऊन अशी कोणती व्ही व्ही आई पी सुविधा विद्यार्थी वर्गास ही नवीन फर्म देणार आहे .. ? आणि त्यासाठी तिप्पट पैसे तुम्ही विध्यार्थी वर्गावर म्हणजेच पर्यायी पालकांवरच आकारणार असाल तर याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध कारतो ..
तसेच ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अंदाजे नऊ ते दहा हजार विद्यार्थी सहभाग घेतात त्यातील प्रत्यक्षात दोन ते अडीच हजार विद्यार्थी प्रवेशास प्राप्त होतात.माग बाकीच्यांच्या भरल्या गेलेल्या शुल्करूपी पैस्यांचे काय . ? शिवाय आजपावतोर किती विद्यार्थी वर्गास ( प्रॉस्पेक्टस ) माहितीपत्रक मिळाले ज्याचे शुल्क आपण ५० / -रुपये ठेवले आहे .. ? आमच्या माहिती प्रमाणे प्रॉस्पेक्टस आद्यापही तयार नाहीत पण शुल्क मात्र घेण्यास सुरूवात पण झाली . शिवाय प्रवेश प्रक्रिया राबवित असताना कोविड आजारासाठीच्या ज्या सूचना व नियम केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेले आहेत त्याचे साठीचे ( उदा : – सेनेटायझर , सोशल डिस्टनसिंग , मास्क ) या सर्व बाबींकडे आपण लक्ष देत आहात काय .. ? कॉलेजच्या तटरक्षक भिंतींना भगदाडे पडली असतांना , मैदान , वसतिगृहे , प्रत्येकविभाग , स्वच्छतागृहे व स्वच्छता या कडे दुर्लक्ष करत यांनी म्हणे कोविड साठी ४१ लाखांचा निधी सरकारला जिल्हाधीकारी मार्फत दिला .. चांगलाच आहे आनंदच आहे.
आम्ही पण त्याचे स्वागतच करतो पण ते पैसे शासनाचेच होते,आता हे पैसे आपण विद्यार्थी म्हणजेच त्यांच्या मायबापांकडून वसूल करताय की काय..असा प्रश्न आमच्या समोर उपस्थित होत असून कशातही पारदर्शकता दिसून येत नाही , तेव्हा या सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष लावणे गरजेचे झाले असून विद्यार्थी वर्गावर होणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिप्पट शुल्क वाढी ( रुपये १५० / – ) च्या विरोधात आमची नकारात्मक भुमिका आहे.या तिप्पट ऑनलाईन प्रवेश शुल्काला ब्रिटिश कालीन ” तिगुणा लगान ” असे संबोधले तर वावग होणार नाही . या संदर्भात सर्व विद्यार्थी संघटनेचे नकारात्मक सुर असुन प्रत्येकच संघटनेने याचा विरोध केला आहे तरीपण संस्था चालक मंडळ अशी प्रक्रिया का राबवत आहे कोणास ठाऊक .. तेव्हा हे ऑनलाईन प्रवेश शुल्क वा हे तिप्पट लगान कमी करावे अन्यथा शिवसेना सत्ता असतांनाही नाईलाजाने विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या हितासाठी आंदोलन करण्यास कटिबद्ध राहील , मात्र होणाऱ्या परिणामास आपणच जबाबदार असाल . आशिष ठाकरे (उपशहर प्रमुख अमरावती), प्रवीण दरमकर, शिवम जवंजाळ (विभाग प्रमुख युवासेना), अजिंक्य शेंडे (शाखाप्रमुख युवासेना), शुभम तायडे, सागर गिरासे,वेदांत काळोडे, अजय बोबडे हे शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.