पेंढरी येथील करोडो रुपयांचे धान्य सडल्याने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी केली पाहणी दिला कारवाईचा इशारा पेंढरी क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुल्लमवार यांची भेट

271

 

हर्ष साखरे दखल न्युज भारत

धानोरा:
तालुक्यातील पेंढरी येथे आदिवासी विकास महामंडळां मार्फत सन 2019-20 मध्ये दोन ठिकाणी उघड्यावर धान खरेदी करण्यात आलेला आहे. उघड्यावर असलेला धान्य आदिवासी विकास महामंडळ, संचालक कार्यकारिणी व संबंधित विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे खरेदी करण्यात आलेला करोडो रुपयांचे धान्य संपूर्ण खराब होऊन पाण्यात गेलेला आहे, त्यामुळे शासनाला करोडो रुपयांचे नुकसान होणार आहे. त्या दोन्ही ठिकाणचे उघड्यावर खरेदी केलेला धान्य मोकाट जनावरे व पाढीव प्राणी तिथे जाऊन खातात व नासधूस केले असून दुर्गंधी पसरली आहे. त्याठिकाणी पाणी साचला असून डासांचा प्रमाण वाढलेला आहे. तेथील लोकांच्या आरोग्याला धोका होणार असल्याचे प्रश्न निर्माण झालेला आहे.
म्हणून या सर्व गंभीर बाबींचा जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक जनता करत आहे.
अश्या पद्धतीचा भयानक परिस्थिती पाहता संबंधितावर कारवाई झाली पाहिजे. तसेच येथील धान्याची उचल त्वरित करण्यात यावी. नाहीतर तालुका व जिल्हास्तरावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा भागातील नागरिक केले आहेत.
यावेळी संजय गावडे, छबीलाल बेसरा, रानु गावडे, मंदाकिनी बेसरा, प्रमोद गावडे, ईश्र्वर खोब्रागडे, रुपेन नाईक, देवा लोनबले त्या भागातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. अश्या पद्धतीचा खरेदी केलेला धान्य त्या संबंधितांच्या बेजबाबदार पणामुळे दुरवस्था झालेली आहे अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.