बाप्पाला निरोप देताना विसर्जनासाठी गेलेले दोघे रत्नागिरी-भाट्ये येथे बुडाले

0
184

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी : काल दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होते काल रत्नागिरीतही रविवारी दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. मात्र या विसर्जनाला रविवारी रात्री गालबोट लागले. शहरानजिक असणाऱ्या भाट्ये टाकले समुद्रकिनारी विसर्जनासाठी गेलेले दोघे बुडल्याची घटना घडली. दीड दिवसाच्या बाप्पांना रविवारी निरोप देण्यात आला. मात्र या निरोपाला गालबोट लागले. शहरानजिक भाट्ये टाकले येथे विसर्जनासाठी गेलेले दोघे बुडाल्याची घटना घडली. या दोघांचा शोध रात्री उशिरा पर्यंत सुरू होता. पोलीस, महसूल आणि स्थानिक प्रशासन शोधकार्य सुरू होते. बुडालेले दोघेही तरुण होते. त्यामध्ये विशाल सुनील पिलणकर वय वर्ष 33 व सत्यवान शरद पिलणकर वय वर्षे 30 दोन तरुण बुडाल्याने गावात शोककळा पसरली आहे एका क्षणात हे सर्व घडले बरोबर असणाऱ्या लोकांच्या हे लक्षात आले मात्र उशीर झाला होता.

*दखल न्यूज भारत*