मांगरुळ येथील दीड वर्षात दोन भावंडावर काळाची झडप, माता पितांची वेदनादायी थट्टा

क्रुर नियतीने पुसले तिच्या कपाळावरील दोनदा कुंकू

433

 

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

मारेगाव: दीड वर्षापूर्वी मोठ्या भावाचे अपघाती मृत्युने दीड वर्षाच्या बाळाचे पितृछत्र हरविले.पत्नीवर आभाळभर दु:ख अन वेदनाचे सावट असतांना लहान भावाने जुन्या रुढी परंपरेला फाटा देवून विधवा वाहिनीशी लग्न करुन तिच्या आयुष्यात प्रकाश फैलविला.या संसाररुपी वेलीवर नऊ महिण्याचे अंकुर तिच्या पोटात वाढत असतांना रविवार (दि.२३)ला दुसर्याही पतीवर नियतीने डाव साधला.आजचे सूर्याचे किरण त्याच्या अपघाती मृत्यु वर पडल्याने क्रुर नियतीने तिच्या कपाळा वरील तब्बल दोनदा कुंकू पुसल्याने ही मन हेलावणारी घटना मांगरुळ येथील ढूमणे कुटुंबात घडल्याने पोटच्या दोन्ही तरुण मुलांना अपघाताने कवेत घेवून आई वडिलांना पोरके केल्याची दुर्देवी व वेदनादायी घटना घडली.
मारेगाव तालुक्यातील मांगरुळ येथील शेतकरी मोहन व रेखा ढूमणे यांचे सुखी कुटुंब.त्यांना दोन मुले.थोरला रितेश तर धाकटा राकेश.रितेशचे लग्न घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा येथील रजनी हिचेशी चार वर्षापुर्वी झाला होता. शेती हा मुख्य व्यवसाय करित असतांना नियतिच्या मनात काही वेगळेच होते.नियतीने डाव साधत रितेशचा गौराळा नजीक मार्च २०१९ ला अपघात झाला.त्यातच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.दीड वर्षाचा साकेत नावाचं बाळ असतांना रजनी वर वेदनादायी प्रसंग ओढावत तिच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली.साकेत च्या आयुष्याचे काय ?भविष्य काय व कसे होणार या विचाराने तिच्या मनात घर केलय.बहुदा हा विचार सासू,सासरे,व दीर यांच्या मनातही घोंगावू लागले.
दादा गेलाय..वहिनीलाही अत्यल्प दिवसात क्रुर नियतीने विधवा केलय.हा मनात घोंगावणार्या विचाराने लहान भाऊ राकेश (२९) याला पछाडले.कुटुंबात व निवडक मित्रा करवी तिच्या अंधारमय आयुष्याला प्रकाश द्यायचा हा विचार सामोर आला.आजच्या काळातील शिकलेल्या, नौकरी करणार्या राकेश ने तिच्या शी लग्न करण्याचा निर्णय घेतला.आजच्या हायटेक जमान्यात व नविन विचारसरणी च्या तरुणांनी कुणाला, केव्हा व कशी साथ द्यावी याचे जिवंत आदर्श उदाहरण राकेश ने दाखवून देत गेल्या वर्षी पांडवदेवी मंदिरात सर्वसमक्ष वहिनी सोबत लग्न केले.
रजनी च्या आशा आकांशेवर फुंकर घालीत तिचे भावी स्वप्न जिवंत केल्याने आगळा वेगळा हा आदर्श आजच्या तरुणा सामोर ठेवला.राकेश व रजनी यांच्या संसार वेलीवर नऊ महिन्याचे अंकुर अवघ्या दिवसात पृथ्वीतलावर येत असतांना राकेश वर काळाने झडप घातली.नेहमी प्रमाणे वॉकींग करायला निघाला असतांना रविवार ला सकाळी साडेपाच वाजताचे दरम्यान अद्न्यात वाहनाच्या धडकेत तो जागीच गतप्राण झाला अन रजनीच्या कपाळावरील क्रुर नियतीने कुंकू पुसले.सर्वांसाठी नि:शब्द झालेल्या या घटनेने ढुमने कुटुंबावर काळाची झडप अंधारमय आयुष्य वाट्याला आले.आई,वडील ,सुन ,नातू आता शून्याकडे बघत आहे.दोनदा तिच्या वाट्याला आलेल्या नवर्याच्या प्रेतावर चुडा फोडल्याचा धिरगंभीर प्रसंग सर्वांचे मन हेलावून टाकत आहे.