नालीवरील पुल ठरतोय जीवघेणा स्थानिक नागरिकांतुन संताप व्यक्त, नगरपरिषदेचे दुर्लक्ष

214

 

प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली-शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील नालीवर असलेला पुल हा लोकांच्या जीवाशी खेळत आहे.दहा महिन्याच्या कालावधीत
वारंवार तक्रार करूनही नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे.काल दोन अपघात झाले त्यात शुभम बोरकर (पंचशील वार्ड, साकोली)हे आपल्या मोटारसायकलने जात असताना पुल खचला व ते बचावले.तसेच एक मुलगी पायी चालत जात असताना पुल खचला व तीचा ताबा सुटल्याने नालीत पडली पन सुदैवाने दोघांनाही काही इजा झाली नाही.या मार्गावर शाळा असल्याने शालेय विद्यार्थी ये-जा करीत असतात.लोखंडी सळाखी उघड्या पडल्याने अनेकांचे अपघात होण्याचे संभव आहे.
एखाद्याचा जीव गेल्यावर संबंधित विभागाला जाग येईल का असा स्थानिक नागरिकांतुन संताप व्यक्त केला जात आहे.म्हनुन नगरपरिषदने हा पुल लवकरात लवकर दुरुस्त करणे गरजेचे आहे.नगरपरिषदेच्या ज्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये हा खड्डा येतो त्या नगरसेवकांनी तरी याबाबत लक्ष देउन त्वरीत दुरुस्तीबाबत लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली.