कूरखेडा येथील एका व्यवसायिकाचा एन्टिजेन टेस्ट तपासणीत अहवाल पॉजिटिव

313

कुरखेडा/राकेश चव्हान प्र कुरखेडा

शहरातील १४९ व्यावसायीकांची रविवार रोजी कोवीड 19 ची एंटीजन टेस्ट(तपासणी) करण्यात आली यापैकी एका व्यावसायीकाचा अहवाल कोरोना पाज़ीटिव आल्याने शहरात खळबळ माजलेली आहे
नगरपंचायत प्रशासनाचा वतीने येथील बाजारपेठेतील सर्व व्यावसायीकाना सूचणा पत्र देत कोवीड 19 ची तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते व तपासणी न केल्यास दंडात्मक कार्यवाहि करण्यात येईल ,या आवाहनाला प्रतिसाद देत येथील उपजिल्हा रूग्नालयाचा वतीने येथील आय टि आय इमारतीत १४९ व्यावसायिकांची कोविड १९ एंटीजन टेस्ट(तपासणी) करण्यात आली यावेळी एका व्यावसायीकाचा अहवाल कोरोना पाज़ीटिव आला त्याला उपचाराकरीता तात्काळ येथील कोरोना रूग्नाकरीता निर्माण करण्यात आलेल्या विशेष रूग्नालयात हलविण्यात आले आहे व त्याचा कूटूंबियाना कोरांटाईन करण्यात आले आहे तसेच येथील गांधी वार्डाला लागुन असलेल्या आंबेडकर वार्ड चा काही भाग सूद्धा चारही बाजूनी बेरीकेडिंग लावत सिल करण्यात आला आहे व सदर सील केलेला परिसर कंटेंटमेंट ज़ोन घोषित करण्यात आला आहे.