देशी कट्टा , ४ काडतुस, दोन तलवार सह एक आरोपीस अटक

कन्हान पोस्टे चे सपोनि मेश्राम सह गुन्हे पथकांची कारवाई.

237

 

 

कमलसिंह यादव
पाराशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत, नागपुर

कन्हान (ता प्र): – कन्हान पोलीसानी पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहीतीवरून शिवमंदीर फुकटनगर कांद्री येथे आरोपी परशुराम गौतम याचे जवळुन घातक शस्त्र एक देशी कट्टा,४ काडतुस, दोन तलवार असा एकुण २७ हजार रूपयाचा मुद्देमालासह आरोपीस अटक केली.
रविवार (दि.२३) ला सायंकाळी ६. ३० ते ७ .३०वाजता दरम्यान कन्हान पोलीस स्टेशनचे सहायकपोलिस निरिक्षक सतिश मेश्राम व गुन्हे पथक पेट्रोलींग करित असताना खात्री शीर गुप्त माहीती मिळाल्याने फुकटनगर शिवनगर जवळ कांद्री येथील युवक अवै द्यरित्या शस्त्र बाळगुन फिरत असल्याने पोलीसानी तेथे पोहचुन आरोपी परशुराम मखगु गौतम वय २९ वर्ष रा शिवनगर फुकट नगर वार्ड क्र ४ कांद्री यास थाबवु न झडती घेतली असता त्याचे जवळ एक देशी बनावटी कट्टा किंमत १७ हजार रू. ४ जिवंत काडतुस किमत २ हजार रू मिळाल्याने त्यांच्या घरी शोध घेतला असता दोन तलवार किंमत ८ हजार रू असा एकुण २७ हजार रूपयाचे घातक शस्त्रा अवैद्यरित्या बाळगत असल्याने आरोपीस पोलीस स्टेशन कन्हान ला आणुन आरोपी विरूध्द कलम भारतिय ह्त्यार कायदा कलम ३/२५, ४/२५ , सहकलम १३५ मपोका अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. सदर कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, कन्हान थानेदार अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात स पो नि सतिश मेश्राम, गुन्हे पथक पोहवा, येशु जोसेफ, राहुल रंगारी, संजय बरोदिया, मुकेश वाघाडे, सुधिर चव्हाण, संदीप गेडाम आदीने सक्रिय सहभाग घेत केली. पुढील तपास सपोनि सतिश मेश्राम करित आहे.