फरार रयतप्रमुख राहुल कडू भावासह पथ्रोट पोलिसांना शरण, दाबावातून सरपंच पतीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचे प्रकरण

413

अमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील येणाऱ्या जवलापूर पार्डी येथील आदिवासी महिला सरपंच गंगा पवार यांचे पती रघुनाथ पवार यांनी पोळ्याच्या पाडव्याच्या दिवशी रयत प्रमुख राहुल कडू व त्यांच्या समर्थकाच्या दबावाखाली विष प्राशन करुन आत्महत्या केली होती याप्रकरणी पथ्रोट पोलिसांनी गंगा पवार यांच्या तक्रारीवरून सात आरोपीवर गुन्हे दाखल केले होते त्यापैकी पाच आरोपीना अटक केली होती तर दोन आरोपी राहुल कडू व त्याचा भाऊ रोजगार सेवक अरविंद कडू हे दोघे फरार होते
काल दि 22 ऑगस्टला रयतप्रमुख राहुल कडू व अरविंद कडू या दोन आरोपीनी पथ्रोट पोलिसांसमोर शरणागती पत्कारली
जुलै महिन्यात राहुल कडू उपसरपंच निर्मला बायस्कर रोजगार सेवक अरविंद कडू यांनी महिला सरपंच गंगा पवार यांना जातीवाचक शिवीगाळ केली होती या प्रकरणाची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती व त्याच प्रकरणात आरोपीना जामीन मिळाला होता जामीन मिळाल्यानंतर आरोपीनी गंगा पवार यांचे पती रघुनाथ पवार यांना धमकावले होते व दबाब टाकला होता याच दबावातून रघुनाथ पवार यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली होती
ऍक्टसिटी ऍक्ट प्रकरणात जर आरोपीना जामीन मिळाला नसता तर आदिवासी महिला सरपंच गंगा पवार यांचे पती रघुनाथ पवार यांनी दबावातून आत्महत्या केलीच नसती अशी चर्चा नागरिकात आहे