भाजपा विमुक्त भटक्या जमाती आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी सुरेशजी मांडवगडे यांची नियुक्ती – लोहार समाजाची अभिमानाची बाब

355

 

गुड्डीगुडम ग्रामीण प्रतिनिधी/रमेश बामनकर

दखल न्युज भारत नेटवर्क
गुड्डीगुडम:- भाजपा विमुक्त भटक्या जमाती आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी *श्री.सुरेशजी मांडवगडे* यांची भाजपा गडचिरोली जिल्हा अध्यक्ष श्री किसन नागदेवे यांनी फेरनिवड केली आहे विशेष म्हणजे सुरेशजी मांडवगडे यांची तिसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आहे आणि यांनी वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर चे सचिव पदावर1दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत आहेत.
श्री.मांडवगडे यांची सर्वप्रथम एप्रिल २०१३ साली पहिली निवड झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा तालुकावार दौरा टप्प्याटप्प्याने करून आघाडीच्या तालुका कार्यकारिणी तयार केल्या.अश्या सुसज्ज तालुकानिहाय व जिल्ह्याची कार्यकारिणी तयार केल्या असून मौलिक कामगिरी नियमितपणे पार पाडत आहेत.
श्री मांडवगडे यांनी पक्षाकरिता कुशल संघटक असल्याने पक्षावाढीसाठी महत्वाची कामगिरी केलेली आहे.या सर्व गुणवत्तेची विचार करून त्यांची आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी तिसऱ्यांदा निवड केली आहे.
त्यांच्या फेरनिवडी बद्दल खासदार अशोक नेते, आमदार डॉ देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, राज्य सदस्य बाबुराव कोहळे प्रमोद पिपरे,योगिता पिपरे व भाजपा जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना श्रेय दिले.
श्री.सुरेशजी मांडवगडे यांची भाजपा विमुक्त भटक्या जमाती आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यामुळे जिल्ह्यातील लोहार समाजाचे जिल्हा संघटना,तालुका संघटना, गाव संघटना व लोहार समाजाचे सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीने सर्वत्र कौतुक व अभिनंदन करीत आहेत.