आज नव्या 21 रूग्णांची नोंद 32 रुग्ण कोरोनामुक्त उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू बाधित रुग्णांचा एक हजाराचा पल्ला

0
154

 

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत..
गोंदिया दि.23 जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात कोरोना संसर्गाचा आलेख वेगाने वाढत आहे.आज 23 ऑगस्ट रोजी गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालात 21 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांनी एक हजाराचा पल्ला गाठला असून बाधित रूग्णांची एकूण संख्या 1014 झाली आहे.आज 32 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.तर 22 ऑगस्ट रोजी रात्री गोंदियाच्या माताटोली येथील 75 वर्षीय रुग्णाचा गोंदिया येथील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गोंदिया येथील प्रयोगशाळा चाचणीतून जिल्ह्यातील 799 नमुने आणि रॅपिड अँटिजेन चाचणीतून 222 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे.असे एकूण 1021 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे.यामध्ये काही रुग्णाच्या दोन्ही चाचण्या करण्यात आल्यामुळे नमुन्यांची संख्या ही वाढत आहे.

जे 21 रुग्ण आज कोरोना संसर्गित आढळून आले आहे यामध्ये गोंदिया तालुक्यातील 15 रुग्ण आहे. यामध्ये गोंदिया शहरातील मामा चौक, गणेशनगर, गांधी वार्ड,रामनगर, संजयनगर,यादवनगर,माताटोली येथील प्रत्येकी एक रुग्ण.फुलचुर व छोटा गोंदिया येथील प्रत्येकी दोन रुग्ण आणि तीन रुग्ण हे कन्हारटोली येथील आहेत.

तिरोडा तालुक्यातील नहारटोला येथील एक रुग्ण,गोरेगाव तालुक्यातील देवटोला,चांदणीटोला व सहारवाणी येथील प्रत्येकी एक रुग्ण,सडक/अर्जुनी येथील एक रुग्ण व एक रुग्ण भंडारा येथील आहे.या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1014 झाली आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 1014 झाली आहे. यामध्ये बाधित आढळलेले रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका -410,तिरोडा तालुका-268, गोरेगाव तालुका -35, आमगाव तालुका -76, सालेकसा तालुका-40, देवरी तालुका -41,सडक/अर्जुनी तालुका -56,अर्जुनी /मोरगाव तालुका – 82 आणि बाहेर जिल्हा व राज्यात आढळलेले -6 रुग्ण आहे.

कोरोनावर मात करून आतापर्यंत जिल्ह्यातील 742 रुग्ण घरी गेले आहेत. यामध्ये गोंदिया तालुका- 267,तिरोडा तालुका -230, गोरेगाव तालुका -17, आमगाव तालुका -48, सालेकसा तालुका -35,देवरी तालुका -40, सडक/अर्जुनी तालुका – 44, अर्जुनी/मोरगाव तालुका -57 आणि इतर -4 रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना क्रियाशील रुग्ण संख्या 259 असून ती तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका- 137, तिरोडा तालुका-32, गोरेगाव तालुका -18, आमगाव तालुका -28, सालेकसा तालुका -5, देवरी तालुका -1, सडक/अर्जुनी तालुका -11, अर्जुनी/मोरगाव तालुका -25 आणि इतर – 2 असे एकूण 259 रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.254 क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात तर 5 रुग्ण हे नागपूर येथे उपचार घेत आहे.

विषाणू प्रयोगशाळा चाचणीतून 799 रॅपिड ॲन्टीजन चाचणीतून 222 असे एकूण 1021 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे.तर आतापर्यंत बाधित रूग्णांची संख्या 1014 झाली आहे. काही रुग्णांचे नमुने दोनदा घेण्यात आल्यामुळे रुग्णापेक्षा पॉझिटिव्ह नमुन्यांची संख्या जास्त आहे.

जिल्ह्यातील ज्या कोरोनाबाधित रुग्णांनी आज कोरोनावर मात केली अशा रुग्णांची संख्या 32 आहे. यामध्ये गोंदिया तालुका -10, तिरोडा तालुका-12, आमगाव तालुका-3, गोरेगाव तालुका -1,सालेकसा तालुका- 3,देवरी तालुका-2 आणि एक रुग्ण सडक/अर्जुनी तालुक्यातील आहे.एकूण 742 रूग्ण आजपर्यत कोरोनावर मात करून बरे होऊन घरी गेले आहे.

विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण 14131 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 12740 नमुने निगेटिव्ह आले. तर 799 नमुने पॉझिटिव्ह आले आहे. 188 नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून 404 नमुन्यांच्या अहवाल अनिश्चित आहे.

जिल्ह्यातील विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात 73 व्यक्ती आणि गृह विलगिकरणात 947 व्यक्ती अशा एकूण 1020 व्यक्ती विलगिकरणात आहेत. हया सर्व व्यक्ती प्रशासनाच्या देखरेखीखाली असून आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांची नियमीत आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार करीत आहे.

संसर्ग बाधित रुग्णांचा तात्काळ शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. जिल्ह्यात 8568 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 8346 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले.222 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 79 चमू आणि 65 सुपरवायझर 137 कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे.ज्या गावात आणि नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे तो भाग कंटेंटमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे.

क्रियाशील कॅटेंटमेंट क्षेत्र 137आहे. गोंदिया तालुक्यात चांदणीटोला, रामाटोला-2, कुडवा व कटंगीकला, गोंदिया शहरातील यादव चौक, रेलटोली, रेल्वे लाईन, श्रीनगर, शास्त्री वार्ड,संगम बिल्डींग गल्ली, क्षत्रिय मार्ग श्रीनगर, सिंधी कॉलोनी, शास्त्री वार्ड क्र.2., रामाटोला-2, कुंभारटोली,लक्ष्मी राईस मिल परिसर, न्यू लक्षमीनगर, लोहा लाईन.

सालेकसा तालुक्यातील भजेपार,सीतेपार, झालिया, धानोली, तिरखेडी, केहारीटोला, गोरे, शारदानगर, आमगाव/खुर्द, सिंगलटोली, न्यू पोलीस कॉलनी, गिरोला,रामाटोला,पोवारीटोला,ननवा वार्ड -2, धानोली-2, टोयागोंदी व बापुटोला.

देवरी तालुक्यातील भागी, नवाटोला, ककोडी, देवरी शहरातील वार्ड क्रमांक 5,7,10, 15, 16 व 17.सडक/अर्जुनी तालुक्यातील कोलारगाव, पाटेकुररा, पांढरवाणी, हलबीटोला,डव्वा, मुंडीपार, सडक/अर्जुनी येथील वार्ड क्र.13,14 व 17, सौंदड येथील गांधी वार्ड,कोहळीटोला, रेंगेपार,खाडीपार व मडीटोला.

आमगाव तालुक्यातील किंडगीपार, तिगाव, चिरचाळबांध, बनगाव वार्ड क्र.1,2 व 3, डोंगरगाव, पदमपूर-1 पदमपूर-2, रिसामा, कुंभारटोली, शिवनटोली, रिसामा-2, आमगाव शहरातील भवभूती वार्ड, फ्रेंड्स कॉलोनी, वार्ड क्र.3 व 4,रिसामा वार्ड क्र.5, बोधा गावाचा समावेश आहे.

तिरोडा तालुक्यातील बिरसी 1 व 2, वडेगाव,मुंडीकोटा,सतोना,लाखेगाव,माली,लोणार,खैरबोडी,गुमाधावडा, वडेगाव-2,गोंडमोहाडी,पाटीलटोला, खडकी, काचेवानी, मेंढा, मलपुरी, गराडा,इसापूर,सेजगाव,पालडोंगरी, पिपरिया,खुर्शीपार,उमरी,पांजरा, सरांडी , घोघरा, सरांडी, घोघरा-2, मुंडीकोटा बाजार चौक, खोलगाव, सालेबर्डी, खैरलांजी, सरांडी-2, सर्रा, कवलेवाडा, बयाबाब(मुंडीकोटा), तिरोडा शहरातील न्यू सुभाष वार्ड, महात्मा गांधी वार्ड, लक्ष्मी वार्ड, रविदास वार्ड, महात्मा फुले वार्ड, लक्ष्मीनगर, प्रगतीनगर, किल्ला वार्ड,शहीद मिश्रा वार्ड,साईनगर, शास्त्री वार्ड व रामनगर आदीचा समावेश आहे.

अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी, सिंगलटोली, नवेगावबांध,ताडगाव व वडेगाव आणि गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी, पिंडकेपार, तेढा व तुमखेडा गोरेगाव शहरातील नगरपंचायत वार्ड क्र.2 आणि पोलीस कॉलोनीचा समावेश आहे.जिल्ह्यात काही रुग्णांचे नमुने दोनदा घेतले आहे.