चपराळा अभयारण्य क्षेत्रात बिबट्याची दहशत

174

उपसंपादक/ अशोक खंडारे
चामोर्शी तालुक्यातील चपराळा अभयारण्यातील चौडमपल्ली लगाम परीसरात बिबट्याची दहशत असून गेल्या दोन तीन महीन्यांपासून धन्नूर, चपराळा, सिंगनपली, कांचनपूर,गीताली , लगाम चेक ,काकरगटटा,येथील कोंबडया ,बक- यांना मारून पळविल्याने चपराळा अभया अरण्यातील गावांसह परिसरात दहशत पसरली आहे एकविस ऑगष्ट च्या रात्री दहा साडे दहा वाजताच्या सुमारास लगाम चेक येथील भगवंतराव आश्रम शाळेच्या बाजूला सिताराम कारू गेडाम यांच्या राहत्या घरी बिबटयाने हल्ला करून एक बकरा , व एुका बकरीला ठार केले परंतू बक ऱ्या दोराने बांधून असल्याने व कुत्राने जोरदार प्रतिकार केल्याने कोंबडयाला घेऊन पसार झाला , त्यi नंतर रात्री पहाटेच्या सुमारास लगाम चेक येथील एका इसमाच्या घरुन बिबट्याने कोबडी मारून जंगलात निघून गेला या बाबत वनविभागाला माहीती देण्यात आली असून वनविभागाने बिबट्याचा बदोबस्त करावा व तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परीसरातील पशुपालकांनी केली आहे.