पणज येथील महालक्ष्मी माता यात्रा महोत्सव रद्द

131

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

अकोट तालुक्यातील ग्राम पणज येथील महालक्ष्मी माता मंदिरात दरवर्षी यात्रा महोत्सव व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन महाप्रसाद समीती व समस्त गावकरी मंडळी पणज यांच्या कडून करण्यात येत होते.या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी जेस्टं गौरी पुजनाच्या दिवशी करण्यात येत होते सतत तीन दिवस पणज नगरीत भाविक महालक्ष्मी मातेच्या दर्षना करीता दुरवरुन दाखल होत. होते परंतु या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तरी सर्व भावीक भस्तांनी याची नोंद घ्यावी असे महालक्ष्मी माता मंदिर महाप्रसाद समीती आणी समस्त गावकरी मंडळी पणज यांनी कळवीले आहे.सर्वत्र भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासना कडून यात्रा महोत्सव या सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नसल्यामुळे हा महाप्रसाद व यात्रा महोत्सवाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे .बोर्डी नदीच्या काठावर आणी पुरातन काळापासून असलेल्या महालक्ष्मी माता मंदिर पणज ग्रामस्थांचे ग्राम दैवत म्हणून सर्वत्र महाराष्ट्रत ओळख आहे.या मंदीरात दर्शना करीता भावीकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसत होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने अकोला जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणी साजरे होणारे कार्यक्रम रद्द केले आहे. अशातच पणज येथील महालक्ष्मी माता मंदिरात यात्रा महोत्सव या कार्यक्रमाला शासनाने परवानगी न दिल्याने हा पण यात्रा महोत्सव कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. याची सर्व भाविक भस्तांनी नोंद घ्यावी असे महालक्ष्मी माता महाप्रसाद व यात्रा महोत्सव समीती आणी समस्त गावकरी मंडळी पणज यांनी कळवीले आहे.