खळबळजनक घटना, कोलेरा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

456

 

वणी : परशुराम पोटे

वणी पोलीस स्टेशन हद्दीतील कोलेरा (पिंपरी)येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
संदिप विठ्ठल लालसरे (३०)असे म्रुतकाचे नाव आहे. संदिप हा आपल्या वयोव्रुद्ध आई व भावासोबत कोलेरा येथे १५ वर्षापासुन राहत असुन तो मोलमजुरीचे काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करित होता.परंतु अलिकडे काम मिळत नसल्यामुळे तो नैराष्यत जिवन होता.अशातच दि.२२ आँगष्ट्ला शनिवारी सायंकाळी ७ वाजताचे दरम्यान गळफास लावुन आत्महत्या केली असावी,अशी माहिती मिळाली आहे.