पेढी नदीच्या पात्रात पडून वझरखेडच्या 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

286

अमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वझरखेड येथील 30 वर्षीय युवकाचा पेढी नदीच्या पात्रात पडून मृत्यू झाला
वलगाव पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार सचिन रमेशराव राऊत वय 30 वर्ष रा वझरखेड हा युवक वझरखेड वरुन कामुंजाकडे पायी जात असतांना दोन्ही गावांना जोडणाऱ्या पेढी नदीच्या पुलावरुन नदी पात्रतात खाली पडला हि बाब रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच त्याला बाहेर काढून वलगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला याप्रकरणी वलगाव पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे