दखल न्युज भारतच्या बातमीचा प्रभाव अखेर बातमीची घेतली बारब्रिक्सने दखल बिर्सी इसारिया पेट्रोल पपंजवळील डायव्हर्सन झाला दुरुस्त

141

 

बिंबिसार शहारे /अतित डोंगरे

तिरोडा : सलग दोन दिवस बिर्सी जवळील पुलियाजवळील डायव्हर्सन फुटले होते. त्याची डागडुजी झाली नसल्याने यातायात ठप्प झाल्याने याचा परिणाम सर्वांना भावोगावा लागला आहे. एवढेच नव्हे तर बिर्सी पासून ते विहिरगाव पर्यंत ट्रकांची रांग पहावयास मिळत होते. बिर्सी हे कंटेन्मेंट झोन असल्याने ड्रायव्हर कंडक्टर यांना भूकमारीचा सामना करावा लागला होता. आता हे मार्ग पूर्ववत झाले असल्याने अदानी वीज कारखान्यात काम करणारे कामगार, बसने जाणारे प्रवाशी, अत्यावश्यक कामासाठी तुमसर तिरोड्यास जाणारे प्रवाशी या सर्वांनी सुस्कारा टाकला आहे. दखलने घेतलेल्या बातमीचा मागोवाने मार्ग सुरू झाले असल्याने दखल न्यूज भारतचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.