शेतकऱ्यांसाठी सुरक्षित फवारणी या विषयावर प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

173

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

पणज शेतामध्ये पिकांवरील किड नियंत्रणासाठी केली जाणारी असुरक्षित फवारणी शेतकऱ्यांना आरोग्यासाठी घातक ठरू शकते. ही बाब लक्षात घेऊन याविषयावर जनजागृती करण्यासाठी अकोट तालुक्यातील ग्राम पनज येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित सौ. वसुधाताई देशमुख कृषी महाविद्यालय, बोडणा अमरावती येथील अंतिम वर्षाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव या सातव्या सत्रातील विद्यार्थी कृषिदूत ईश्वर अकोटकर यांनी “सुरक्षित फवारणीचे प्रात्यक्षिक” कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये शेतकऱ्यांना पिकांवरील कीड नियंत्रणासाठी फवारणी करतांना कशा प्रकारे काळजी घ्यावी, याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय देशमुख, रावे सत्र प्रभारी प्रा. डॉ. इंद्रप्रताप ठाकरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. दिपीका उके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात गावातील श्रीकांत आवंडकर, मनोहर अवंडकर, सौरभ नवघरे, परीक्षित देशमुख, अभिजीत नवले, व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.