संपूर्ण भीमा परिवार सुधाकरपंत परिचारक यांच्या अनंत उपकारांच्या ओझ्याखाली प्रा.संग्राम चव्हाण

439

 

सोलापूर ग्रामीण प्रतिनिधी ॥ ऋषीकेश

संघटक समन्वयक भीमा परिवार सहकार क्षेत्राचे ‘पितामह’असा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असलेले आदरणीय सुधाकरपंत परिचारक यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली असून त्यांच्या निघून जाण्याने सहकार तसेच राजकीय क्षेत्रात निर्माण झालेली मोठी पोकळी म्हणजे कधीही भरून न येणारे नुकसान आहे.विशेषतः टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत असताना तो चालू करण्यासाठी त्यांनी त्यावेळी अथक् परिश्रम घेऊन कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांची बंद पडलेली चूल चालू केली. यापुढेही त्यांनी सभासदांच्या ऊसाला उच्चांकी दर देत कारखान्याच्या सभासदांना सतत भेडसावणाऱ्या अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी दूरदृष्टी दाखवून ‘ विस्तारीकरण प्रकल्प ‘ राबविला व काही अंशी सभासदांच्या अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कारखानयाला उर्जिता अवस्था प्राप्त करुन देण्यामधे त्यांचा मोठा वाटा होता.
भीमा कारखान्याचे चेअरमन म्हणून कार्य करत असताना त्यांनी उसाचे बिल जाहीर करताना कधीही हात आखडता घेतला नाही.उलट जिल्ह्यात सर्वात जास्त बिल नेहमीच जाहीर करून भीमाच्या सर्वच सभासदांच्या मनावर कायम राज्य केले. पोळ्याचे बिल,संक्रांतीचे बिल,कांडंबील जाहीर करण्याबाबत ते सर्व ऊस उत्पादक सभासदांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. भीमा कारखान्यासाठी परिचारक यांनी दिलेले योगदान हे अनमोल असून कुणालाही ते नाकारता येणार नाही. सद्यस्थितीतील राजकीय प्रवाह तसेच गटातटाचे राजकारण काहीही असो परिचारक यांनी केलेले कार्य हे केवळ अविस्मरणीय असून संपूर्ण भीमा परिवाराचे सर्व सदस्य,विद्यमान संचालकमंडळ,सर्व कार्यकर्ते,नेतेमंडळी ही परिचारक यांच्या कारखान्यावरील अनंत उपकाराच्या कायम ओझ्याखाली राहतील आणि आणि ही भावना मनात जपणं हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल.असे दुःखोद्गार भीमा परिवाराचे संघटक समन्वयक प्रा. संग्राम चव्हाण यांनी काढले.

कै. सुधाकरपंत परिचारक यांनी सहकार तसेच राजकीय क्षेत्रात त्यांच्या कारकिर्दीत केलेले कार्य दीपस्तंभासारखे दिशादर्शक असून त्यांची विचारसरणी तसेच त्यांनी जपलेली मार्गदर्शक मूल्ये यांना अनुसरून कार्य करण्याचा निर्धार करून त्यांचे अपूर्ण काम पूर्णत्वाला नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणं हीच त्यांच्यासाठी मनापासून आदरांजली असेल असे प्रतिपादन भीमा कारखान्याचे विद्यमान चेअरमन माजी खासदार धनंजय ऊर्फ मुन्नासाहेब महाडिक यांनी यावेळी केले.

धनंजय ऊर्फ मुन्ना साहेब महाडिक (माजी खासदार) चेअरमन भीमा सहकारी साखर कारखाना