रमाई घरकुल योजनेला निधी द्या। कुरखेडा येथील घरकुल लाभार्थ्यांची मागणी

209

 

राजेंद्र रामटेके
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
दखल न्युज भारत
मो.9403227751

कुरखेडा पंचायत समिती अंतर्गत रमाई घरकूल योजनेत भेदाभेद, शासनाचा चालू असून, एकीकडे पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना यांना निधी आहे.परंतु रमाई योजनेला निधी नाही याचा कारण काय? असा प्रश्न निर्माण झाला असून याकडे स्थानिक लोकप्रतनिधींनी दखल घेऊन आम्हाला तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावी.
असे रमाई घरकुल लाभार्थी मागणी करीत आहेत, जेणेकरून प.स.कडे ये,जा, करने कमी होईल व रमाई योजनेची निधी तात्काळ द्यावी अशी मागणी प.स.कुरखेडा येथे होत आहे.