राज्यव्यापी संपात गडचिरोली जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा सहभाग

191

 

ऋषी साहारे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत

गडचिरोली :- केंद्र शासनाने 5 जून काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे यांनी पुकारलेल्या शुक्रवारच्या बंद मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सहभागी . याबाबत गडचिरोली जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी संपा बाबतची माहिती दिली.
केंद्राच्या या अध्यादेशामुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम होऊन बाजार समिती कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल, शेतकऱ्यांना सोयी सुविधा देता येणार नाहीत, विकास कामे करता येणार नाहीत, सेवकांचे पगार होणार नाहीत तसेच बाजार घटकांवर विपरीत आर्थिक परिणाम होईल अशी भीती सहकारी संघाने व्यक्त केली. बाहेरील शेतमालाला हमीभाव बंधन नाही.
या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी शुक्रवारी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली ,अरमोरी , चामोर्शी, अहेरी व सिरोंचा बाजार समिती व समितीचे कर्मचारी या संपात सहभागी झालेत. त्यामुळे दिनांक 21/ 8/ 2020 रोज शुक्रवार ला गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली,आरमोरी, चामोर्शी, अहेरी व सिरोंचा बाजार समितीचे मुख्य बाजार तसेच उपबाजार येथील या यार्डावरील अन्नधान्य लिलाव व कार्यालयीन कामकाज बंद राहणार आहे. शेतकरी, व्यापारी ,हमाल, मापाडी यांना यासंबंधीची कल्पना देण्यात आली असल्याचेही समितीने सांगितले.