अल्पवयीन मुलीला गर्भवती करणाऱ्यांवर कारवाई करा. आदिवासी कंवर समाज समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

356

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

कोरची येथील एका घरकाम करणा-या आदिवासी कुटूंबातील अल्पवयीन तथा काहीशी मतिमंद असलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे ती गर्भवती झाली आहे. सदर पिडीत मुलगी आरोग्य विभागाच्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका यांचे मार्फत ऊपचार घेत आहे. मात्र या संदर्भात अजूनही पोलीस तक्रार झाली नाही व मुलीने अथवा तिच्या नातेवाईकांनी कुणाचेही नाव घेतले नाही. त्यामुळे सदर कुटूंब दबावात येऊन तक्रार करीत नसावेत असा संशय बळावला आहे.
सदर मुलगी कोरची येथील एका आदिवासी कंवर समाजाची असुन ती काही अंशी मतिमंद असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मागील एक वर्षापासून ती स्थानीय व्यावसायिकाकडे धुणीभांडी करून गुजराण करीत होती. दरम्यान तिच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर 8 ते 9 महीण्यांपूर्वी अत्याचार केला.त्यातून तिला गर्भधारणा झाली. हे लक्षात आल्यानंतर तिचा एका अवैध डॉक्टर कडून गर्भपात करण्याचाही प्रयत्न केला गेला. परंतू पोटातील गर्भ 4 महीण्यांपेक्ष मोठा असल्याने डॉक्टरने नकार दिला.
याच आठवड्यात हे प्रकरण गावात पूढे आले असुन सध्या तिच्या पोटात 7 महीने 20 दिवसाचे अर्भक वाढत आहे. आरोग्य सेविका,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या मार्गदर्शनात तिची देखभाल सुरु आहे. अपुष्ट माहिती नुसार 13 आगष्ट ला आरमोरी येथील एका सोनोग्राफी सेंटर मध्ये तिची सोनोग्राफी केली असून आरोग्य तपासणी करण्यासाठी ती नियमितपणे ग्रामीण रूग्णालय कोरची येथे जात आहे. सोनोग्राफी रिपोर्ट वरून अर्भकाचे वजन 1.700 कि.ग्र. असल्याचे सांगितले जात आहे.
या अत्याचारासंदर्भात सदर मुलगी जिथे धुणीभांडी करीत होती त्या दोन व्यापारी बंधुंचे व त्यांच्याच दुकानात काम करणा-या एका नोकराचे नाव घेतले जात आहे. हा व्यापारी एका राजकिय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचीही माहिती समोर आली आहे.
ऊल्लेखनीय आहे की, अल्पवयीन मुलगी जर कुठल्याही कारणाने गर्भवती झाली. तरी तो कायद्याने बलात्कार ठरतो. अशा मुलीच्या कोणत्याही वैद्यकीय तपासणीपूर्वी संबंधित चिकित्सा प्रबंधनाने रीतसर पोलीसांत तक्रार दाखल करणे बंधनकारक असताना आरमोरी येथील सोनोग्राफी सेंटर, जिथे पिडीतेची सोनोग्राफी करण्यात आली व कोरचीच्या ज्या सरकारी दवाखान्याच्या माध्यमातून किंवा आशा वर्करच्या माध्यमातून तिचेवर ऊपचार सुरू आहेत, त्या डॉक्टर्स किंवा आशा वर्कर ने पोलीसात तक्रार कां केली नाही? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. सदर अत्याचार प्रकरणात बलात्कार, एट्रोसिटी व पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केले जाऊ शकतात.

अल्पवयीन आदिवासी मुलीच्या या अत्याचार प्रकरणात आदिवासी कंवर समाजातील बैठकही पार पडली असून मात्र या बैठकीनंतरही पोलीसांत तक्रार केली नाही. काही स्थानिक समाजसेवकांनीही पिडीतेची व तिच्या कुटूंबियांची भेट घेतली असुन, तो अत्याचारी कोण एवढीच माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समजते. परंतू अल्पवयीन पिडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीसात तक्रार दाखल कां केली जात नाही. हा प्रश्न अद्यापही कायम आहे.
आदिवासी कंवर समाज सेवा समितीचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.डाँ.मेघराज कपूर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली की सदर पीडित मुलीला न्याय मिळवून देऊन दोषींवर कार्यवाही व्हावी.