निराधार वृद्ध महिलेच्या मदतीला धावून आले युवारंग चे सदस्य

0
199

 

हर्ष साखरे ता प्रतिनिधी आरमोरी

आरमोरी शहरातील प्रभाग क्रमांक ३ बाजारपेठ वरील प्रगती चौक मधील निराधार असलेल्या इंदिराबाई मानकर ह्या चार घरचे भांडे धुण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह चालवितात अजून पर्यंत घरात विजेच्या बल्ब ची व्यवस्था नाही आजही जिवन अंधारातच आहे सतत होणाऱ्या पावसामुळे आज दी.२१ ऑगस्ट २०२० ला पहाटे ठीक २ वाजता एका बाजूची भिंत भर पावसातच कोसळली त्यामुळे खूपच गंभीर समस्या निर्माण झाली ही बाब युवारंगच्या सदस्यांना कळताच कुठलाही विलंब न करता त्वरित ताडपत्री घेऊन संपूर्ण घराच्या सभोवताली लावण्यात आली याप्रसंगी युवारंग चे सर्व सदस्य उपस्थित होते.