यवतमाळ/ परशुराम पोटे
मारेगांव -वणी मार्गावरील पेट्रोल पंप जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
राकेश ढुमणे रा.मांगरुळ ता.मारेगाव हा सकाळी ६ वाजताचे सुमारास मारेगाव- मांगरुड मार्गावर फिरायला गेला होता.या दरम्या एका भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात राकेश गंभिर जखमी झाला.त्याला मारेगांव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता तेथिल डॉक्टरांनी मुत्यु घोषित केले असुन
शव शवविच्छेदनासाठी मारेगांव ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहे.
सदर घटनेचा तपास मारेगाव पोलीस करित आहे.