पी. एम. किसान योजनेबाबत मंगळवारी विशेष शिबिर

167

 

प्रतिनिधी सुदर्शन राऊत जालना

महाराजस्व अभियान अंतर्गत घनसावंगी तालुक्यातील पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी मंगळवारी 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता प्रत्येक गावनिहाय विशेष शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी दिली आहे.
या शिबिरात पात्र लाभार्थ्यांची यादी चावडी वाचन करून दाखविली जाईल. तसेच अपात्र, बोगस व मयत लाभार्थी वगळण्यात येणार आहेत. आज रोजी पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळणारा शेतकरी सदर शिबिरात उपस्थित राहून नाव नोंदणीचा अर्ज करु शकतो. सदर शिबिर सोशल डिस्टन्सचे पालन करुन पालक अधिकारी यांनी आयोजित करावा. या शिबिरात ज्या शेतक-यांना लाभ मिळण्यास अडचणी आहेत अथवा नाव नोंदणी करावयाची आहे त्याच शेतक-यांनी उपस्थित रहावे. सर्व शेतक-यांनी उपस्थित राहू नये. या शिबिरात सोशल डिस्टन्सचे पालन आणि कोरोना प्रतिबंधक मोहिमेचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता पालक अधिकारी यांनी घ्यावी. जे गाव कन्टेनमेंट झोनमध्ये आहे त्या गावात शिबिराचे आयोजन करण्यात येणार नाही. त्यांच्या पी.एम. किसानच्या तक्रारी बाबत नव्याने शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी सांगितले.
चौकट
यासंदर्भात नायब तहसीलदार गौरव खैरनार व संदिप मोरे यांनी सांगितले की या शिबिरात ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच ज्यांच्या नावावर शेती नाही, आयकर भरणारे शासकीय कर्मचारी आणि कुटुंबातील 18 वर्षाच्या आतील लाभार्थ्यांना वगळण्यात येणार आहे.