महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील सहकुटुंब परिवारा सहित त्यांच्या  निवासस्थानी गणरायाची परंपरे नुसार स्थापना केली.

193

 

इंदापूर तालुका प्रतिनिधी बाळासाहेब सुतार दिनांक 22

महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील  यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबा समवेत गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केले. सौभाग्यवती पत्नी भाग्यश्री ताई पाटील इंदापूर तालुक्यातील गोरगरिबांचे कैवारी चिरंजीव राजवर्धन दादा पाटील साहेब व पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या कन्या अंकिता ताई पाटील यांनी आपल्या कुटुंब समवेत गणरायाला एकच मागणे मागितले की भारत देश कोरोनाच्या  संकटातून लवकरच मुक्त होऊ दे. गोरगरीब शेतकरी कष्टकरी मजूर कामगार शेतमजूर या सर्वांना सुख समाधान प्राप्त होऊ दे असे संकट केव्हाच येऊ देऊ नको गणराया म्हणून गणरायाला नतमस्तक होऊन मागणे मागितले. शेवटी
गणरायाची आरती व पुजा करून महाप्रसाद देण्यात आला.

———————————————–

फोटो:–ओळी– सहकुटुंब परिवारा सहित

गणरायाची आरती करीत असताना माजी सहकारमंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160