शासकीय रक्कम अपहार प्रकरणी – ग्राम पंचायत पेठा येथील माजी सरपंच निला पोरतेट आणि तत्कालीन सचिव भारुडे यांच्यावर गुन्हा दाखल

शासकीय रक्कम फस्त केल्याने गुन्हा दाखल:राजकीय वर्तुळात खळबळ

0
233

 

संपादक जगदीश वेन्नम/रमेश बामनकर

दखल न्युज भारत नेटवर्क
गडचिरोली :- जिल्हा परिषद गडचिरोली चे विद्यमान सदस्य असलेल्या ऋषी पोरतेट यांचे पत्नी ग्राम पंचायत पेठा येथील माजी सरपंच नीला पोरतेट आणि सचिव भारुडे यांनी ग्राम पंचायतच्या विकासासाठी आलेल्या शासकीय रक्कम अफरातफर केल्या प्रकरणी यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
ग्राम पंचायत पेठा येथील सण 2014 ते 2018 या कालावधीत आलेल्या 14 वित्त आयोगाचे रक्कम,5 टक्के अबंध निधी,तेंदू बोनस,गावामध्ये पथदिवे बसविणे,वीज भांडवल,सार्वजनिक विहिरीतून गाळ काढणे,सोलर इन्व्हर्टर बसविणे अश्या विविध योजनेतील जवळपास अर्धा कोठी एवढ्या मोठ्या शासकीय रक्कमेचा अहपरण झाल्याची तक्रार ग्राम पंचायत पेठा अंतर्गत येणाऱ्या सर्व गावकरी यांनी अर्धा कोठी एवढ्या मोठ्या रक्कमेचा अपहार झाल्याची तक्रार जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्यकार्यपालन अधिकारी यांच्याकडे करण्यात आले होते .या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद मुख्यकार्यापालन अधिकारी यांनी ग्राम पंचायत पेठा येथील शासकीय रक्कम अपहरणाचे चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन गट विकास अधिकारी मेहर पंचायत समिती मूलचेरा याना दिले होते.या आदेशानुसार तत्कालीन गट विकास अधिकारी पंचायत समिती मुलचेरा यांनी चौकशी केली असता, ग्राम पंचायत पेठा अंतर्गत येणाऱ्या गावांना विकासासाठी शासनाकडून येणाऱ्या विकास निधीतुन 47 लाख रुपये एवढा मोठ्या शासकीय रक्कम कामे न करता अपहरण केल्याचे सिध्द झाल्याने गट विकास अधिकारी पंचायत समिती अहेरी यांना मुख्यकार्यपालन अधिकारी यांनी 18/8/2020 ला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.यावरून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे निकटवर्ती असलेले ऋषी पोरतेट यांचे पत्नी ग्राम पंचायत पेटा चे माजी सरपंच नीला पोरतेट आणि तत्कालीन सचिव भारुडे यांचेवर गुन्हा दाखल करण्याचे पोलिस स्टेशन देचली येथे गट विकास अधिकारी पंचायत समिती अहेरी यांनी लेखी तक्रार केली.
माजी सरपंच नीला पोरतेट आणि तत्कालीन ग्रामसेवक भारुडे यांनी अपहरण केलेल्या शासकीय रक्कम पुढील प्रमाणे आहे. या मध्ये प्रामुख्याने गाव नक्षलबंदी योजनेतील 2 लाख 75 हजार दोनशे अकरा रुपये,14 वित्त आयोगाचे 9 लाख 16 हजार अकरा रुपये, सार्वजनिक विहिरीतून गाढ काढण्यासाठी एक लाख पन्नास हजार रुपये, LED पथदिवे खरेदी करून गावात बसविण्यासाठी 25 लाख रुपये असे एकूण 32 लाख 9 हजार 440 रुपयेसह अजून विविध योजनेतील जवळपास 47 लाख शासकीय रक्कम अपहार प्रकरणी माजी सरपंच, तत्कालीन ग्रामसेवक यांचेवर गुन्हा दाखल केले असून ग्राम पंचायत पेटा अंतर्गत येत असलेल्या तोडका गावाचे ग्राम कोष समितीचे अध्यक्ष व सदस्य हे सुद्धा या शासकीय रक्कमेच्या अपहार प्रकरणात सहभाग असल्याचे सिद्ध झाली असल्याने यांचेवर कारवाई होण्याची संकेत दिसत आहे.
गाव विकास करण्यासाठी जनतेनी त्यांचे अमूल्य मते देऊन सरपंच म्हणून निवड केलेल्या गावचे विकास करणारे सरपंच सारख्या जबाबदार व्यक्ती गावाच्या विकासासाठी आलेल्या विकास निधी फस्त केले तर गावांचा विकास तरी कशी होणार हे प्रश्न पेठा परिसरातील सामान्य जनतेमध्ये उमटत असुन ग्राम पंचायत पेठाचे माजी सरपंच निला पोरतेट यांच्या प्रती नागरिकांनी रोष व्यक्त करत आहेत.