युवा व्यावसायिकांचे प्रेरणादायी छत्र हरपले – आ. किशोर जोरगेवार

57 व्या वर्षी बांधकाम व्यावसायिक भरत राजा यांचे निधन

807

 

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
अत्यंत गरिबीतून संघर्ष करत बांधकाम या व्यवसाय क्षेत्रात लक्षणीय शिखर गाठणारा, बांधकाम क्षेत्रात येऊ पाहत असलेल्या युवा व्यावसायिकांचा प्रेरणादायी मार्गदर्शक कायमचा हरपला अशी शोकसवेदना भरत राजा यांच्या निधनानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
भरत राजा यांची चंद्रपूर जिल्ह्यात यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळख होती. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने चंद्रपुरातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता. मात्र आज दुपारी त्यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड झाला. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांची भेट घेत त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविले होते. यादरम्यान आ. जोरगेवार हे सतत नागपूर येथील डॉक्टरांच्या संपर्कात होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी चंद्रपुरात पोहचताच हळहळ व्यक्त केली जात असून व्यावसायिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या मृत्यूने बांधकाम क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्याची बातमी मनाला दुःख देणारी असून शून्यातून शिखर अश्या प्रवासाचा आज अंत झाला आहे. कमी भांडवलातही बांधकाम सारख्या व्यावसायिक क्षेत्रात यशाचे यशस्वी शिखर गाठता येत हे त्यांच्या कडून शिकण्यासारखे होते. परिस्थितीला दोष देत अपयशाला घाबरणाऱ्यांसाठी हे क्षेत्र नाही. ही त्यांची शिकवण युवा व्यसायिकांसाठी प्रेरणादाई होती त्यांनी उभारलेल्या चंद्रपूरतील उत्कृष्ट सदनिका नेहमी त्यांची आठवण देत राहतील. कमी पैसे आणि कमी वेळात उत्कृष्ट आणि दर्जेदार काम ही त्यांची ओळख त्यांनी निर्माण केलेल्या बांधकामातून नेहमी स्मरणात राहील असे शोकसंदेशात आमदार किशोर जोरगेवार यांनी मटल आहे.