गडअहेरी नाल्यावरील पूरपरिस्थितीची पाहणी जि.प.अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांनी केली

283

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम:- अहेरी जवळील गडअहेरी गावाजवळ असलेल्या नाल्यावर पुर आला आहे सदर पूरपरिस्थितीची पाहणी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.
गडअहेरी नाल्यावरील कमी उंचीचा पूल असून सदर नाल्यावर दरवर्षी पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असते गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून सततधार पाऊस सुरू असल्याने सदर पुलावरून पाणी वाहत असल्याने देवलमरी-व्येंकटापुर परीसरातील दहा बारा गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.
सदर नाल्यावर उंच पुलाचे काम सुरू असून पूर्णपणे झालेली नसल्याने यावर्षी सुद्धा या परिसरातील नागरिकांना पूरपरिस्थितीचा फटका बसला आहे.
या परिसरातील नागरिकांना रुग्णालय किंवा शेतीच्या अति आवश्यकता वस्तू आवश्यक असेल तर इंदाराम ते सॅन्ड्रा, मोसम ,आलापली,मार्गे अहेरी यावा लागतो.या साठी जास्तीचे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. नूतन पुलाचे काम पूर्ण झाले असते तर या परिसरातील जनतेचा त्रास नेहमीसाठी संपला असता अशी मत व्यक्त करीत होते.
गडअहेरी नाल्यावर असलेल्या पूरपरिस्थितीची व गाव परिस्थितीची पाहणी करण्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी सदर ठीकाणी भेट देवून पाहणी केली आहे.