नांदेड बु येथील गावातील रस्त्याची दयनिय अवस्था, ग्रा पं प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत

418

दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
दर्यापूर तालुक्यातील नांदेड बु या 2500 लोकसंख्या असलेल्या गावात ग्रा पं स्तरावर मोठे मोठे तीन वॉर्ड असून मागील एप्रिल महिन्यात या गावाच्या सरपंचचा कार्यकाळ संपला होता शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रा पं निवडणुका थांबविल्या
नांदेड बु येथे ग्रामसेवक म्हणून शशांक फुले तर प्रशासक म्हणून कुलकर्णी कार्यरत आहेत मात्र प्रशासनातील दोन्ही अधिकारी यांचे मात्र या गावाकडे लक्षच नाही
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत या दिवसात गावातील रस्ते, नाल्या तुडुंब भरल्या आहेत गावातील रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साचलेले असते खड्डयात रस्ता कि रस्त्यात खड्डा हे ओळखणे कठीण होऊन बसले आहे या रस्त्यावरून गावातील नागरिकांना चालणे कठीण होऊन बसले आहे रस्त्यावरील साचलेल्या पाण्यातून साथीचे रोग व इतर रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही पावसाळ्यापूर्वी ग्रा पं प्रशासनाने रस्ता नालीबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही गावाचा विकास कोसो दूर आहे गावच्या विकास कामाकडे सचिव फुले व प्रशासक कुलकर्णी यांचे लक्षच नाही अशी ओरड गावकऱ्यांची आहे
पावसाळ्यात होणारी रस्त्याची दुरावस्था पाहून गावातील अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्डयात साचलेल्या सांडपाण्यात विविध प्रकारचे किटक तयार होतात त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मात्र ग्रा पं प्रशासनास याचे काहीही देने घेणे नाही कुंभकर्णी झोपेत असलेल्या ग्रा पं प्रशासनास वरिष्ठ अधिकारी जागे करतील काय?असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत