राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी स्वतःच्या घरी गणपतीची स्थापना करून सह कुटुंबासहित आरती करण्यातआली.  श्रीगणेश हे महाराष्ट्राचे लाडके व आवडते दैवत आहे.

155

 

इंदापूर तालुका प्रतिनिधी, बाळासाहेब सुतार.  दिनांक:- 22

सर्व महाराष्ट्रात मंगलमय वातावरणात गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना आज उत्साही वातावरणात घरोघरी करण्यात येत आहे. याच पवित्र भावनेने राज्यमंत्री श्री.दत्तात्रय भरणे यांनी देखील त्यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी पत्नी सौ.सारिका भरणे, मुलगा श्रीराज, पुतणी केताली, शीतल व पुतण्या अक्षय प्रितेश व बाकी कुटुंबियांसह दिमाखात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली.

यावेळी राज्यमंत्र्यांनी गणरायाला संकटी पावावे – निर्वाणी रक्षावे अशी प्रार्थना करून राज्यावर, देशावर तसेच जगावर आलेले कोरोनाचे विघ्न नष्ट करण्यासाठी व सर्वत्र प्रेमभाव, आनंद नांदण्यासाठी साकडे घातले. यावेळी राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी जनतेला देखील कोरोनाचे संकट टाळण्यासाठी सर्व योग्य ती खबरदारी घेऊन गणरायाचे स्वागत व गणेशोत्सव आनंदात साजरा करावा असे आवाहन देखील केले. #गणपतीबाप्पामोरया

————————————————–

फोटो:–ओळी– गणपतीची सहकुटुंब आरती करीत असताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मामा

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160