करणवाडी ते खैरी रस्ता ची अत्यंत दुरावस्था:दोन तालुक्याला जोडणारा हा रस्ता खड्डय़ांमुळे वाहन चालवतांना जीव मुठीत घेऊन खड्डे चुकवत सर्कस करावी लागत आहे

युवासेना मारेगाव तालुका तर्फे तहसीलदार मारेगाव यांना निवेदन

267

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

मारेगाव: तालुक्यातील करणवाडी कुंभा बोरी गदाजी या मार्गावर बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे असा प्रश्न निर्माण होत आहे?पावसाळ्याचे दिवस असल्याने त्या खड्ड्यात पाणी साचून अपघातास निमंत्रण मिळत आहे. मात्र अखेरची घटका मोजत असलेल्या या मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. मारेगाव व राळेगाव हा महामार्ग व पुढे जाणाऱ्या मार्गावर बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. या मार्गात गंभीर स्वरूपाच्या अनेक अपघात झाले आहे. अनेक दिवसांपासून सदर मार्ग खड्ड्याने व्यापलेला असून वाहन चालवतांना जीव मुठीत घेऊन खड्डे चुकवत सर्कस करावी लागत आहे.

ही रस्ताची समस्या लक्षात घेता युवासेना मारेगाव तालुक्यातर्फे तहसीलदार साहेब मारेगाव यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी मयुर ठाकरे (युवासेना तालुका प्रमुख मारेगाव) मारुती मुप्पीडवार, श्रीकांत सांबजवार, डॉ. मनिष मस्की, गजानन ठाकरे, विनय डुकरे, गणेश आसुटकर,अमोल डाहूले, भूपेंद्र डाहूले उपस्थित होते.