नाभिक संघ कांद्री-कन्हान चे अध्यक्ष मोतीराम पुंड यांचे दु:खद निधन

367

 

कमलासिहं यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान :- कांद्री येथील नाभिक एकता मंच कांद्री-कन्हान दुकानदार संघ अध्यक्ष मोतीराम विठ्ठलजीं पुंड वय ४१ वर्ष यां- चा अपघातात गंभीर जख्मी झाल्याने खाजगी दवाखाना नागपुर येथे उपचारा दरम्यान चौथ्या दिवसी शुक्रवार (दि.२१) ला रात्री १२ वाजता दु:खद निधन झाले. नाभिक एकता मंच कांद्री-कन्हान व्दारे शनिवार ला दुपारी १२ ते ३ वाजे पर्यंत सर्व सलुन दुकाने बंद ठेऊन श्रध्दाजंली अर्पण केली. त्याचे कांद्री राहते घरून दु. २ वाजता अंतिम यात्रा काढुन कन्हान नदीच्या शांती घाटावर मान्यवरांच्या उप स्थित सामुहिक श्रध्दाजंली अर्पण करून अंतिम संस्कार करण्यात आला. ते मागे आई, वडील, पत्नी, छोटा मुलगा, मुलगी व दोन भाऊ असा बराच मोठा आपत्य परिवार मागे सोडुन गेले.