एस एम एस हॉस्पिटल चे पेड कोरोना केअर सेंटर हॉटेल वक्रतुंड, लोटे एम आय डी सी येथे सुरू.

143

 

प्रतिनिधी / ओंकार रेळेकर.

चिपळूण : शैली मेडिकल सर्व्हिसेस या कोरोना पॅन्डेमिकमधे सुधा आपल्या तीनही शाखांमध्ये म्हणजे खेड चिपळूण व देवरुख येथे २४ तास तात्काळ सेवा देत आहे. यामधे आता कोरोना रुग्णांचा होत असलेला त्रास पहाता हॉस्पिटल व्यवस्थापनाने कोरोना केअर सेंटर चालू करण्याचा निर्णय घेतला. आपल्या खेड, चिपळूण व देवरुख येथील बाकी रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून नवीन जागी हे कोरोना सेंटर सुरू केले आहे. सदर सेंटर हे हॉटेल वक्रतुंड लोटे एम आय डी सी येथे सुरू करण्यात आले आहे. येथे ११ बेड चे आय सी यू तसेच १५ रूम तसेच जनरल वॉर्ड आहेत. येथे सरकारी नियमा नुसार दर निश्चित केले आहेत. २४ तास अनुभवी डॉक्टर व परिचारिका आहेत. फिजिशियन व आय सी यू चा अनुभव असलेले डॉक्टर उपलब्ध आहेत. ११ बेड चे व्हेंटिलेटर सह सुसज्ज आय सी यू व स्वतंत्र रूम्स व कमी उत्पन्न गटा साठी जनरल वॉर्ड ची उपलब्धता येथे आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधितांसाठी ही सुविधा आज पासून सुरु होत आहे. अधिक माहिती साठी ९३७०७९८६७४ या हॉस्पिटल नंबर वर किंवा ९२२४६३९८३३ या नंबर वर डॉ गोंड यांना संपर्क करावा असे हॉस्पिटल प्रशासना द्वारे आवाहन करण्यात आले आहे.

दखल न्यूज भारत