डॉ.पंकज कुडाळकर कोरोना संकट काळात रुग्णांसाठी देवदूत : वसंत उदेग ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल रत्नागिरी आणि पोलीस पाटील असोसिएशन चिपळूण यांच्या वतीने कोविड योध्दा म्हणून डॉ.कुडाळकर यांचा झाला सन्मान

174

 

प्रतिनिधी निलेश आखाडे.

चिपळूण : डॉ.पंकज कुडाळकर कोरोना संकट काळात रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याची फार काळजी न करता अविरत पणे रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा सुरू ठेवली आहे डॉ.कुडाळकर यांचे समाजसेवेचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे,अशी प्रतिक्रिया चिपळूण मधील प्रतिष्ठित उद्योजक श्री दत्त एजन्सी चे मालक वसंत उदेग यांनी व्यक्त केली.
ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल रत्नागिरी आणि पोलीस पाटील असोसिएशन चिपळूण यांच्या वतीने गुहागर बायपास येथील डॉ.पंकज कुडाळकर यांचा बुधवारी ‘कोरोना योद्धा’ म्हणून सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वसंत उदेग यांच्या हस्ते डॉ.पंकज कुडाळकर यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ. कुडाळकर यांनी
देशासाठी तसेच समाजासाठी
स्वत:च्या जीवाची पर्वा न करता
चिपळूण शहरासह पंचक्रोशीतील
नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र
मेहनत घेऊन एक समाजकार्य केले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उद्योजक वसंत उदेग यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ. कुडाळकर यांनी शहरात न जाता ग्रामीण गातच राहुन येथील जनतेची गेली दोन वर्षे ते सेवा करीत आहेत. डॉ. पंकज
कुडाळकर हे चिपळूण अर्बन बँकेच्या संचालिका राधिक पाथरे यांचे बंधू आहेत. सौ. पाथरे यांनी काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात दवाखाना सुरू करण्याचा मनोदय केला होता, त्यांची ही मनोकामना त्यांचे बंधू डॉ. पंकज कुडाळकर यांनी पूर्ण केली असल्याचा
आवर्जुन उल्लेख वसंत उदेग यांनी केला. सामाजिक व धार्मिक क्षेत्रात डॉ. कुडाळकर हे नेहमीस अग्रेसर असतात, असेही त्यांनी सांगितले.यावेळी मरवा इलेक्ट्रीकल्सचे संचालक हरीश दलवाई, दाउद दलवाई, मिरजोळी ग्रा.पं.चे माजी सरपंच कासम दलवाई, पोलीस पाटील संघटना अध्यक्ष दिलावर खडपोलकर, मिरजोळी ग्रा. पं. सदस्य रशीद दलवाई, चिपळूण एन्टरप्रायजेसचे मालक समद दलवाई, फातिमा मेडिकलचे मालक इमदाद चौगुले,
गफार चौगुले, साहिल चौगुले, सुहेल कुरवले, शादाब खोत, सबा दिवेकर, ऐश्वर्या डाकवे आदी उपस्थित होते.
कोरोना संकट काळात डॉक्टर कुडाळकर येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची आपुलकीने विचारपूस करून त्यांना धिर देण्याचे महान कार्य करीत आहेत,स्वतःच्या आरोग्याची फार काळजी न घेता ते सतत रुग्णाच्या सेवेत हजर आहेत,कुडाळकर रुग्णांसाठी खरे कोविड योध्दा असल्याची प्रतिक्रिया पुढे बोलतांना वसंत उदेग यांनी यावेळी व्यक्त केली,
कोरोना विषाणू च्या वाढत्या प्रादूर्भाव मुळे सर्वत्र कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र आहे,अशा काळात तत्परतेने सेवा बजावत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डॉ.कुडाळकर उक्ताड ,मिरजोळी,कोढे,साखरवाडी येथील रुग्णांकरिता
अविरतपणे वैद्यकीय सेवा बजावत आहेत,या काळात दरवर्षी प्रमाणे नियमित येणाऱ्या आजरपणावर उपचार घेण्या करीता येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची हसत खेळत आपुलकीने विचारणा करून रुग्णांमधील मानसिक तणाव कमी करून कोरोना रोगाची भिती काढण्याचे महान कार्य ते करीत आहेत,
करोना महामारी सारख्या संकटात आपुलकीची योग्य सेवा देऊन लोकांना महामारी च्या संकटातुन बाहेर काढण्याचे काम करत एक आदर्श निर्माण केला असल्याची भावना या वेळी येथील व्यापारी आणि नागरिकांनी व्यक्त करून डॉ.कुडाळकर यांच्या वैद्यकीय सेवेबाबत कौतुक केले

दखल न्यूज भारत