Home कोरोना  आज 46 नव्या रूग्णांची भर तर 14 रुग्णांना सुट्टी एक हजार...

आज 46 नव्या रूग्णांची भर तर 14 रुग्णांना सुट्टी एक हजार नमुने पॉझिटिव्ह बाधित रूग्णांची संख्या 993 सर्वाधिक क्रियाशील रुग्ण गोंदिया तालुक्यात

181

 

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत..
गोंदिया दि.22 कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात झपाट्याने फैलावत आहे.त्यामुळे बाधितांची संख्या देखील वाढतच आहे.आज 22 ऑगस्ट रोजी 46 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.कोरोनावर उपचारातून बरे झालेल्या 14 रूग्णांना आज सुट्टी देण्यात आली.आतापर्यंत एक हजार नमुने पॉझिटिव्ह आले असून बाधित रूग्णांची संख्या 993 वर पोहचली आहे.

प्रयोगशाळा चाचणीतून जिल्ह्यातील 784 नमुने आणि रॅपिड अँटिजेन चाचणीतून 216 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे.यामध्ये काही रुग्णाच्या दोन्ही चाचण्या करण्यात आल्यामुळे नमुन्यांची संख्या ही वाढली आहे.

आज जे 46 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे यामध्ये गोंदिया तालुक्यातील 25 रुग्ण आहे. यामध्ये गोंदिया शहरातील गांधी चौक,छोटा गोंदिया सिव्हील लाईन,अरिहंत कॉलोनी येथील प्रत्येकी दोन रुग्ण.मामा चौक, रेलटोली, लक्षमीनगर, एम.बी.पटेल वार्ड, पुनाटोली,सुर्याटोला,कुंभारेनगर, रामनगर येथील प्रत्येकी एक रुग्ण, तालुक्यातील कारंजा, बनाथर, मूर्री, तेढवा/दासगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण,तर कटंगी येथील तीन तर कुडवा येथील दोन रुग्ण आहे.

तिरोडा तालुक्यात दहा रुग्ण आढळले असून एक रुग्ण तिरोडा येथील गांधी वार्डचा आहे.आठ रुग्ण हे मलपूरी येथील तर एक रुग्ण मुंडीकोटा येथील आहे. गोरेगाव शहरात दोन रुग्ण,आमगाव तालुक्यातील कातोर्ली व कुंभारटोली येथे प्रत्येकी एक रुग्ण तर आमगाव शहरात तीन रुग्ण आढळले आहे. सालेकसा तालुक्यातील टोयागोंदी व सालेकसा येथे प्रत्येकी एक रुग्ण,देवरी तालुक्यातील ककोडी येथे एक रुग्ण, सडक/अर्जुनी येथील वार्ड क्र.12 येथे एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 993 झाली आहे.

कोरोना संसर्ग झालेले आज जे 46 रुग्ण आढळले आहे.या रुग्णांमुळे जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या 993 झाली आहे. क्रियाशील बाधित रुग्ण संख्या आता 271 झाली आहे. सर्वाधिक 133 क्रियाशील रुग्ण हे गोंदिया तालुक्यात आहे.

कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 993 आहे.यामध्ये बाधित आढळलेले रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका -395, तिरोडा तालुका-267,गोरेगाव तालुका -32, आमगाव तालुका -76, सालेकसा तालुका-40,देवरी तालुका – 41, सडक/अर्जुनी तालुका -55,अर्जुनी /मोरगाव तालुका – 82 बाहेर जिल्हा व राज्यात आढळलेले -5 रुग्ण आहे.

कोरोनावर मात करून जिल्ह्यातील 710 रुग्ण घरी गेले आहेत. यामध्ये गोंदिया तालुका- 257,तिरोडा तालुका -218, गोरेगाव तालुका -16, आमगाव तालुका -45, सालेकसा तालुका -32,देवरी तालुका -38, सडक/अर्जुनी तालुका – 43, अर्जुनी/मोरगाव तालुका -57 आणि इतर -4 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात कोरोना क्रियाशील रुग्ण संख्या आता 271 झाली असून ती तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका- 133, तिरोडा तालुका-43, गोरेगाव तालुका -16, आमगाव तालुका -31, सालेकसा तालुका -8, देवरी तालुका -3, सडक/अर्जुनी तालुका -11, अर्जुनी/मोरगाव तालुका -25 आणि इतर – 1 असे एकूण 271 रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत. यातील 267 क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात तर 4 रुग्ण हे नागपूर येथे उपचार घेत आहे.

विषाणू प्रयोगशाळा चाचणीतून 784 रॅपिड ॲन्टीजन चाचणीतून 216 असे एकूण 1000 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे.तर आतापर्यंत बाधित रूग्णांची संख्या 993 झाली आहे. काही रुग्णांचे नमुने दोनदा घेण्यात आल्यामुळे रुग्णापेक्षा पॉझिटिव्ह नमुन्यांची संख्या जास्त आहे.

कोरोनाबाधित ज्या रुग्णांनी आज कोरोनावर मात केली अशा रुग्णांची संख्या 14 आहे. यामध्ये गोंदिया तालुका -3, तिरोडा तालुका-1, आमगाव तालुका-4, गोरेगाव तालुका -1,सालेकसा तालुका- 4 आणि एक रुग्ण सडक/अर्जुनी तालुक्यातील आहे.एकूण 710 रूग्ण आजपर्यत कोरोनावर मात करून बरे होऊन घरी गेले आहे.

गोंदियाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण 13882 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 12573 नमुने निगेटिव्ह आले. तर 784 नमुने पॉझिटिव्ह आढळून आहे. 154 नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून 371 नमुन्यांच्या अहवाल अनिश्चित आहे.

विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात 79 व्यक्ती आणि गृह विलगिकरणात 896 व्यक्ती अशा एकूण 975 व्यक्ती विलगिकरणात आहेत. हया सर्व व्यक्ती प्रशासनाच्या देखरेखीखाली असून आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांची नियमीत आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार करीत आहे.

संसर्ग बाधित रुग्णांचा तात्काळ शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. जिल्ह्यात 8434 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 8218 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले.216 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 79 चमू आणि 65 सुपरवायझर 136 कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे.ज्या गावात आणि नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे तो भाग कंटेंटमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे.

क्रियाशील कॅटेंटमेंट क्षेत्र जिल्ह्यात 136 असून यामध्ये गोंदिया तालुक्यात चांदणीटोला, रामाटोला-2, कुडवा व कटंगीकला, गोंदिया शहरातील यादव चौक, रेलटोली, रेल्वे लाईन, श्रीनगर, शास्त्री वार्ड,संगम बिल्डींग गल्ली, क्षत्रिय मार्ग श्रीनगर, सिंधी कॉलोनी, शास्त्री वार्ड क्र.2., रामाटोला-2, कुंभारटोली,लक्ष्मी राईस मिल परिसर, न्यू लक्षमीनगर, लोहा लाईन.

सालेकसा तालुक्यातील भजेपार,सीतेपार, झालिया, धानोली, तिरखेडी, केहारीटोला, गोरे, शारदानगर, आमगाव/खुर्द, सिंगलटोली, न्यू पोलीस कॉलनी, गिरोला,रामाटोला,पोवारीटोला,ननवा वार्ड -2, धानोली-2, टोयागोंदी व बापुटोला.

देवरी तालुक्यातील भागी, नवाटोला, देवरी शहरातील वार्ड क्रमांक 5,7,10, 15, 16 व 17.सडक/अर्जुनी तालुक्यातील कोलारगाव, पाटेकुररा, पांढरवाणी, हलबीटोला,डव्वा, मुंडीपार, सडक/अर्जुनी येथील वार्ड क्र.13,14 व 17, सौंदड येथील गांधी वार्ड,कोहळीटोला, रेंगेपार,खाडीपार व मडीटोला.

आमगाव तालुक्यातील किंडगीपार, तिगाव, चिरचाळबांध, बनगाव वार्ड क्र.1,2 व 3, डोंगरगाव, पदमपूर-1 पदमपूर-2, रिसामा, कुंभारटोली, शिवनटोली, रिसामा-2, आमगाव शहरातील भवभूती वार्ड, फ्रेंड्स कॉलोनी, वार्ड क्र.3 व 4,रिसामा वार्ड क्र.5, बोधा गावाचा समावेश आहे.

तिरोडा तालुक्यातील बिरसी 1 व 2, वडेगाव,मुंडीकोटा,सतोना,लाखेगाव,माली,लोणार,खैरबोडी,गुमाधावडा, वडेगाव-2,गोंडमोहाडी,पाटीलटोला, खडकी, काचेवानी, मेंढा, मलपुरी, गराडा,इसापूर,सेजगाव,पालडोंगरी, पिपरिया,खुर्शीपार,उमरी,पांजरा, सरांडी , घोघरा, सरांडी, घोघरा-2, मुंडीकोटा बाजार चौक, खोलगाव, सालेबर्डी, खैरलांजी, सरांडी-2, सर्रा, कवलेवाडा, बयाबाब(मुंडीकोटा), तिरोडा शहरातील न्यू सुभाष वार्ड, महात्मा गांधी वार्ड, लक्ष्मी वार्ड, रविदास वार्ड, महात्मा फुले वार्ड, लक्ष्मीनगर, प्रगतीनगर, किल्ला वार्ड,शहीद मिश्रा वार्ड,साईनगर, शास्त्री वार्ड व रामनगर आदीचा समावेश आहे.

अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी, सिंगलटोली, नवेगावबांध,ताडगाव व वडेगाव आणि गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी, पिंडकेपार, तेढा व तुमखेडा गोरेगाव शहरातील नगरपंचायत वार्ड क्र.2 आणि पोलीस कॉलोनीचा समावेश आहे.जिल्ह्यात काही रुग्णांचे नमुने दोन वेळा घेण्यात आले आहे.

जिल्ह्यातील काही रुग्णांचे नमुने जिल्ह्याबाहेर घेण्यात आले असून निदान झाल्यानंतर त्यांना आपल्या जिल्ह्यात आणले आहे.काही जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे नमुने आपल्या जिल्ह्यात घेतले असून निदान झाल्यानंतर त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी दिली.

Previous articleबारब्रिक्स रस्ता निर्माण कंपनीस शासनाचे व व्यक्तिगत मजुरांचे होणारे नुकसान भरपाईची मागणी दुसऱ्या दिवशी देखील बिर्सी डायव्हर्सन रस्ता नादुरुस्त
Next articleरत्नागिरी जिल्ह्यात ७० नवे कोरोना पॉझिटिव्ह