बारब्रिक्स रस्ता निर्माण कंपनीस शासनाचे व व्यक्तिगत मजुरांचे होणारे नुकसान भरपाईची मागणी दुसऱ्या दिवशी देखील बिर्सी डायव्हर्सन रस्ता नादुरुस्त

137

 

बिंबिसार शहारे/अतित डोंगरे

तिरोडा : तालुक्या अंतर्गत चालणाऱ्या बस सेवा २० ऑगष्ट पासून सुरू झाल्या असल्या तरी पावसाच्या पाण्याने जागो जागी रस्ता फुटल्याने आवगमनास रोखथांब झालेली आहे.
बिर्सी येथे पुलाचे कार्य सुरू आहे. बाजूने रस्ता डायव्हर्सन करून आवगमान सुरू होते. हे डायव्हर्सन फुटल्याने गोंदिया, तिरोडा, साकोली मार्ग ते तुमसर, भंडारा मार्गाचे यातायात ठप्प झालेले आहे.
आज दुसरा दिवस असून देखील डायव्हर्सन चे काम अद्याप बारब्रिक्स रस्ता निर्माण कँपनीने केले नसल्याने जनतेला समंश्यांना सामोरे जावे लागत आहेत.

अदानी वीज कारखाण्यात तिरोडा परिसरातील गावोगावचे नागरिक येथे कामास जातात. परंतु बारब्रिक्स रस्ता निर्माण कम्पणीच्या ढिसाळ कारभाराने अद्याप डायव्हर्सनचे काम पूर्ण झाले नसल्याने संताप व्यक्त केले जात आहे. यास पदाधिकारी यांचे कोणतेही लक्ष नसल्याचे यावरून लक्षात येते. यामुळे अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहे.

एकीकडे शासनाचे व व्यक्तिगत होणाऱ्या नुकसानाची भरपाई बारब्रिक्स रस्ता निर्माण कडून केली जावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.