गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर अकोट पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न शासनच्या आदेशाचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा, पोलीस अधिक्षक

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

सध्या संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असून त्यामुळे उद्धवलेल्या परिस्थितीचा विचार करता श्री गणेश उत्सव व मोहरम साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांनी २१ ऑगस्ट रोजी शहर पोलीस स्टेशन मधील सावली सभागृह येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत अकोट तालुक्यातील व शहर वासीयांना केले.
यावर्षी उद्धवलेले कोरोना परिस्थिती मुळे गणेशाचे आगमन व विसर्जन सध्या पद्धतीने करावे तसेच पोलीस प्रशासनासह नगर पालिकेची रीतसर परवानगी घेणे गणेशाच्या समोरचे सजावटी चे व मंडपाची भमके बाजी न करता ती अतीशय साध्या पद्धतीचीे असावी,नियमानुसार सार्वजनिक गणेश मंडळ करीता चार फुटापर्यत मूर्ती आवश्यक असून घरातील मूर्ती दोन फुटा पेक्षा लहान असावी, विसर्जनाच्या वेळी गर्दी करणे टाळावे तसेच या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम ऐवजी स्वछता, आरोग्य, कोरोना विषयी जणजागृती करावी जेणे करून कोरोना संसर्गजन्य रोगापासून संरक्षण शक्य होईल, सर्वांनी श्री. गणेशाच्या मूर्ती चे विसर्जन एकत्रित रित्या काढू नये ,मास्क व सेनीटायझर चा वापर बंधनाकारक आहे. अशा प्रकारचे अनेक नियम पाळून गणेश उत्सव साजरा करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या पुढे सर्व धर्मियांच्या सणांचे दिवस येत असून सर्व धार्मिक सन हे घरा मध्ये साजरी करून कोरोना संसर्गजन्य आजाराची सावधानता बाळगुण साजरी करण्याचे अवाहन करण्यात आले. यावेळीं उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.सोनोने, अकोट शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष महल्ले, ग्रामीण चे ज्ञानोबा फड, महावितरण चे श्री अग्रवाल , नगराध्यक्ष माकोडे, नायब तहसीलदार राजेश गुरव,हरीश गुरव,न .प.इंजिनिअर वाघमारे ,शांतता समिति सदस्य व श्री गणेश मंडळ अध्यक्ष आदी हजर होते.