चंद्रपुर जिल्हा व शहर काॅग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागाच्या वतिने योगी सरकारचा जाहिर निषेध

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
चंद्रपुर जिल्हा व शहर काॅग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागाच्या वतिने योगी सरकारचा जाहिर निषेध चंद्रपुर जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला यावेळी योगी सरकार विरुद्ध प्रचंड नारेबाजी व घोषणाबाजी करण्यात आली.

काॅग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उर्जामंत्री नितिन राऊत हे उत्तर प्रदेशातील आजमगढ़ मधील बांसा गांव येथे दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पु राम याची गोळ्याझाडुन हत्या करण्यात आली होती याची दखल घेण्यासाठी ते दौ-यावर गेले असता त्यांना आजमगढ़ येथे न जाऊ देता सिमेवर आले होते. या घटनेचे तिव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले.

चंद्रपुर जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर काॅग्रेस कमेटी एससी सेल प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, जिल्हाअध्यक्ष रामु तिवारी, कॄऊबास सभापती दिनेश चोखारे, एससी सेल जिल्हाअध्यक्ष पवन आगदारी, एससी सेल शहराध्यक्ष कुनाल रामटेके, माजी पंस सभापती रोशन पचारे, उसगाव ग्रापं सदस्य प्रेमानंद जोगी व प्रशांत सारोकर यांनी जाहिर निषेध केला.