गडचिरोली विधानसभा मतदार संघात म्हाडाच्या धर्तीवर गोरगरीब जनतेला तयार घरे देणार आमदार डॉ देवराव होळी

129

उपसंपादक / अशोक खंडारे
गडचिरोली विधान तहसभा मतदार संघातील नगर परिषद गडचिरोली नगर पंचायत चामोर्शी ,नगर पंचायत धानोरा येथील सर्वसामान्य गोरगरीब जनता ज्यांच्याकडे स्वतःची जागा व राहण्यासाठी घर नाही अश्या मोलमजुरी करणारे शेतमजूर वनमजूर नागरिक यांना स्वतः च्या हक्काचे घर मिळाले पाहिजे याकरिता गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी म्हाडाच्या धर्तीवर घर उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे व तसे नियोजनही केले आहे
तसे प्रत्येक नगर पंचायत व नगर परिषद येथे यादी तयार करण्याचे काम प्रगती पथावर आहे
म्हाडाच्या धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यात समस्त तालुक्यात हजारो गोरगरीब जनतेला घरे मिळाली पाहिजे या करिता आ,होळी यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पाठपुरावा केला होता तसे आदेश मु,का,अ , म्हाडा यांना देण्यात आले होते परंतु भारतीय जनता पक्षाचे सरकार परत न आल्याने सदर विषय थंड बस्त्यात गेला होता परंतु पुन्हा आमदार डॉ होळी यांनी सदर मुद्दा उचलून धरला व सबंधित मंत्रालयाची परवानगी व जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन सदर म्हाडाच्या घरांसाठी सबंधित नगर पंचायत नगर परिषद यांना जागेसाठी निर्देश देण्यात आले आमदार डॉ देवराव होळी यांचे जनसंपर्क कार्यालयात ज्यांना घर व जागा नाही अश्या नागरिकांनी आपले नाव देण्याचे जाहीर आव्हान करण्यात आले आहे