एसीसी सीमेंट कम्पनी च्या अस्तव्यस्त उभ्या असलेल्या ट्रक व टैंकर मुळे घुग्घुस वासियांचे आरोग्य व जीव धोक्यात

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
घुग्घुस जवळ तीन किमी अंतरावर असलेल्या नकोडा या गावात एसीसी चांदा सिमेंट कम्पनी लिमिटेड हा कारखाना असून या कारखान्यातुन सिमेंटची वाहतूक जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर करण्याकरिता जिह्ल्याची सीमा ओलांडून रोज शेकडो ट्रक व सिमेंट टँकर, तेलंगाणा, गुजरात व अन्य राज्यातून,तसेच रेड झोन असलेल्या मुंबई ,नाशिक व नागपूर तथा इतर जिल्ह्यातून येत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सरकार शासन पातळीवर शर्तीचे प्रयत्न करीत असून या कंपनीचे व्यवस्थापण मात्र शासनाने ठरवलेल्या संपूर्ण नियमांचे आणि सोशल डिस्टंसीगचे काटेकोर पणे पालन करत नसल्याचे पाहण्यात येत आहे. वाहन चालकांची व वाहकाची वैदयकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून त्यांना कंपनी कडून सैनिटायझ करणे आवश्यक आहे परंतु कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आहे . तसेच हे ट्रक चालक व वाहक नकोडा व घुग्घुस येथील बाजारपेठेत राजरोस पने फिरत असल्यामुळे या ट्रक चालक व वाहकाच्या माध्यमातून कोरोना या संसर्गजन्य रोगाची घुग्घुस परिसरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासन आणि प्रशासन कोरोनावर मात करण्यासाठी दिवस रात्र विविध उपाय योजना करीत असताना ही कंपनी सरकारच्या उपाययोजना पायदळी तुटवीत असल्याचे दिसून येत आहे.

मात्र काही दिवसां पासून कम्पनी ने कहरच केल्याचे दिसून येत आहे .एसीसी कंपनीने सिमेंटनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पार्किंगची व्यवस्था केली असून घुग्घुस -सिमेंटनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहन उभी केली जाते यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या कामगारांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अनेकांना या पूर्वी अपघातामधे आपले प्राण तसेच अवयव गमवावे लागले आहेत व दिवसागणित इतर कीरकोळ अपघात सुद्धा होत आहेत . यावर कड़ी म्हणून की काय चंद्रपूर रस्त्यावरील नवीन बायपास मार्गावर सुद्धा दोन्ही बाजूला वाहने उभी केल्या जात असून ही वाहने एसीसी सिमेंट कंपनी मधून सिमेंटची वाहतूक करण्यासाठी आली आहेत असे कळते. या बायपास मार्गावर मॉर्निंगवॉकला मोकळ्या हवेत फिरण्यासाठी स्त्री, पुरुष, मुले, मुली सकाळ व संध्याकाळी येतात परंतु या रस्त्यावर हे ट्रक चालक शौचास करून ठेवत असल्याने दुर्गन्धी पसरली आहे . या रस्त्यावर कायम नाक बंद करून फिरावे लागत असून तरुण मुली बघून हे चालक छेडखानी सुद्धा करीत असल्याची चर्चा आहे.
हे सर्व ट्रक या बायपास मार्गावर कोणाच्या सम्मति ने कंपनी उभे ठेवत आहे हे अजुन कोडेच आहे. सिमेंटनगर रस्त्यावरील व बायपास मार्गावरील ट्रक व सिमेंट टँकर त्वरित हटविण्यात यावे व या सर्व प्रकाराची चौकशी करुन घुग्घुस पोलिसांच्या वाहतूक विभागाने सुद्धा त्वरित कार्यवाही करुन कंपनी ला या बाबत समज द्यावी व एसीसी सीमेंट कंपनीस या सर्व अतिरिक्त ट्रक व टैंकर ची उभे राहण्याची योग्य व्यवस्था करण्यास बाध्य करावे अशी मागणी सुरक्षा कंत्राटी कामगार सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष किशोर बोबडे व माजी उपसरपंच सुधाकर बांदूरकर यांनी केली आहे.