कृषि पंपाच्या विज जोडण्या त्वरित करण्यात याव्या. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांना निवेदन सादर.

152

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(जाहिराती व बातम्या करीता मो. 8275228020)

आरमोरी :-
गडचिरोली जिल्हातील शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय निर्माण होण्याकरिता नदी नाल्यावर कृषि पंप बसविण्यासाठी एप्रिल २०१८ मध्ये विज कनेक्शन करीता डिमांड भरले असताना अजुन पर्यंत कृषी पंपाचे विज कनेक्शन जोडुन दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेण्यासाठी तसेच पावसाळ्याच्या दिवसात पाणी देण्यास मोठी अडचण निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांच्या कृषि पंपाच्या विज जोडण्या तात्काळ करण्यात यावे अशी मागणी लाॅरेन्स आनंदराव गेडाम यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्याकडे त्यांनी आरमोरी दौरा केला असता शिष्टमंडळासह भेटुन निवेदनातून केली आहे.

गेल्या मार्च एप्रिल २०१८ पासुन गडचिरोली जिल्ह्यातील कृषि पपांचे विज कनेक्शन अजुन पर्यंत जोडुन दिले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी पिक घेण्यासाठी तसेच पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे या बाबत अनेक वेळा शेतकऱ्यांनी सुध्दा कृषि पंपाचे विज कनेक्शन जोडुन देण्यात यावे यासाठी वारंवार कार्यकारी अभियंता विजय मेत्राम यांच्या कडे मागणी केली आहे परंतु अजुन पर्यंत डिमांड भरुणही शेतकऱ्यांना विज जोडण्या करुण मिळाल्या नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्या अभावी फार मोठा प्रमाणात नुकसान होत आहे या बाबींची लाॅरेस आनंदराव गेडाम यांनी दखल घेऊन शेतकऱ्यांच्या हीताकरीता तात्काळ महाराष्ट्र राज्याचे उजामत्री नितीन राऊत यांच्या कडे बैठक लाऊन शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न तात्काळ मागी लाऊन शेतकऱ्यांच्या विज जोडण्या करण्यात यावे अशि मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत आरमोरी ला दौऱ्या दरम्यान प्रत्यक्ष भेटुन निवेदनातून केली आहे. या वेळी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष तथा नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली जिल्हा सेवादल अध्यक्ष राजु गारोदे, देसाईगंज युवक काँग्रेसचे अध्यक्ष पिकु बावणे, आरमोरी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोरभ जखमवार, विधानसभा युवक काँग्रेसचे सचिव निलेश अबादे, यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.